Mahavitran Agriculture Bill agrowon
ॲग्रो विशेष

Mahavitran Agriculture Bill : कृषी पंपाच्या नावाखाली फार्म हाऊसना वीज जोडणी, महावितरण चाप लावणार का?

Mahavitran : महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेबनाव करून घेतलेले कनेक्शन शोधण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

sandeep Shirguppe

Agriculture Electric Bill : कृषी पंपधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. वीज युनिटच्या सवलतीच्या दरावरील पैसे सरकारकडून महावितरणला दिले जातात. मात्र, अनेक ठिकाणी कृषी पंपाच्या नावाखाली फार्म हाऊसलाही अनेकांनी वीज जोडणी घेतली आहे. संबंधित ग्राहकाला त्याच्या वीज वापरानुसार वीज जोडणी देताना स्वतंत्र मीटर देणे आवश्यक असते. त्याद्वारे त्याचे बिल आकारणी स्वतंत्र केली जाते.

मात्र, तरीही काही आर्थिक सेटलमेंट करून कृषी पंपधारक म्हणून फार्म हाऊसला वीज जोडण्या दिल्याचे महावितरणने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचा विचार करून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेबनाव करून घेतलेले कनेक्शन शोधण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोहिमेसाठी एक महिन्याची मुदत

ज्याचे फार्म हाऊस आहे, त्यांनी स्वतंत्र वीज मीटर घेणे गरजेचे असते. त्या गटातील वीज ग्राहकांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्याची तरतूद आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, अनेकांनी विजेचा दर कमी बसावा, यासाठी कृषी पंपाच्या नावाखाली फार्म हाऊसला वीज घेतली आहे. त्यामुळे महावितरणला आर्थिक फटका बसत आहे. त्याची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कृषिपंपाला सवलतीच्या दरात वीज

कृषी पंपधारकांना वीजदर सवलत योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे. राज्यातील सर्वत्र ती लागू आहे. या योजनेंतर्गत महावितरण कृषीपंप चालविण्यासाठी वापर करण्यात आलेल्या एकूण विजेच्या वापरावर ६० टक्के सवलत देण्यात येते. देयकातील ४० टक्के रकमेचा भरणा कृषी पंपधारकाने करायचा असतो.

महारवितरणकडून देण्यात येणाऱ्या ६० टक्के सवलतीची रक्कम शासनाकडून महावितरणला देण्यात येते. राज्यात सरासरी वीजपुरवठा हा साडेसहा रुपयांनी प्रतियुनिट केला जातो, तर कृषी पंपांना एक रुपया ८८ पैसे या सवलतीच्या दराने वीज मिळते.

आर्थिक साट्यालोट्यातून कनेक्शन ?

महावितणने वीज वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची कॅटॅगिरी वेगवेगळी केलेली आहे. त्यामुळे कोण किती विजेचा वापर करतो, त्या प्रमाणात त्याला वीज बिल दिले जाते. त्यानुसार त्याच्या वीज दराची आकारणीही वेगवेगळी केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी शेती पंपाच्या नावाखाली फार्म हाऊसला वीज घेण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

संबंधित फार्म हाऊसला स्वतंत्र मीटर घेऊन त्यांनी त्याद्वारे वीज वापरावी, असा दंडक महावितरणचा आहे. मात्र, अनेक ठिकाणी आर्थिक साट्यालोट्यातून असे वीज कनेक्शन देण्यात आल्याचे दिसत आहे. कनेक्शन शोध मोहिमेतून भांडाफोड महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेती पंपाच्या नावाखाली कनेक्शन घेऊन त्याची वीज अन्यत्र वापरल्याचे दिसून आले आहे.

त्यांनी त्याच्या शोध मोहिमेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित कनेक्शन कधी देण्यात आले, कोणी दिले, कसे दिले, त्याच्याकडून किती पैसे भरून घेण्यात आले ? यासह अन्य बाबींची माहिती आता त्याद्वारे समोर येणार आहे. त्यामुळे त्यासाठी होणाऱ्या चौकशीतून आता या सर्व प्रकाराचा भांडाफोड होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT