Lok Sabha Election 2024 Maharashtra : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, संयुक्त पत्रकार परिषदेत यादी जाहीर

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.
Lok Sabha Election 2024 Maharashtra
Lok Sabha Election 2024 Maharashtraagrowon
Published on
Updated on

Mahavikas Aghadi List Lok Sabha : मागच्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून घमासान सुरू होते दरम्यान आज त्यावर अखेर पडदा पडला आहे. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवालयामध्ये पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची याची जाहीर केली. यामध्ये लोकसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना (ठाकरे गट) २१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढणार आहे. दरम्यान सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या १७ जागा

नंदूरबार, धुळे, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, जालना, मुंबई उत्तर मध्य, उत्तर मुंबई, रामटेक, कोल्हापूर, नांदेड, अकोला, पुणे, सोलापूर, अमरावती, चंद्रपूर.

Lok Sabha Election 2024 Maharashtra
Lok Sabha Election : राजू शेट्टींची भूमिका ‘एकला चलो रे’ची

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० जागा

बारामती, शिरुर, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर दक्षिण, सातारा, वर्धा, बीड.

शिवसेना ठाकरे गटाच्या २१ जागा

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई (North West), मुंबई ईशान्य, पालघर, कल्याण, मावळ, धाराशीव, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, जळगाव, परभणी, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलडाणा, यवतमाळ -वाशिम अशी यादी संजय राऊत यांनी यादी वाचून दाखवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com