Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Theft : मराठवाड्यात २३ कोटी ७८ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडल्या

Power Theft Marathwada : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात गत आर्थिक वर्षांत २ कोटी ७५ लाख ८५ हजार ८६६ युनिट वीज चोरी प्रकरणी २३ कोटी ७८ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडल्या.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात गत आर्थिक वर्षांत २ कोटी ७५ लाख ८५ हजार ८६६ युनिट वीज चोरी प्रकरणी २३ कोटी ७८ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडल्या. त्यामध्ये अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली. तर १८ कोटी ७७ लाख रुपये वसूल करण्यात आले व १७७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या माहितीनुसार,एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ५,९०३ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात ३,२२१ मीटरमध्ये वीज चोरी, अनधिक्रत वापर व इतर कारणासाठी अवैध वीज वापर आढळून आला होता.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,धाराशिव व बीड जिल्हयात एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत भरारी पथक आणि दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविली.

विघुत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेतकऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम १३५ मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.

मोहीम यापुढेही चालू राहणार

वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये.अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले.

वीज चोरीची रक्कम लाख रुपयांमध्ये पुढील प्रमाणे

वीजचोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कम

छ.संभाजीनगर ग्रामीण ३६० २६७.१५

जालना ३८९ २८२.८४

छत्रपती संभाजीनगर १६५० ११२१.०८

परिमंडल

बीड ८५ ६९.२४

धाराशिव २५८ १७६.९७

लातूर ४४९ ३७७.९०

लातूर परिमंडल ७९२ ६२४.११

नांदेड ४१७ ३००.१३

हिंगोली ६४ ४०.३०

परभणी २९८ २८३.९०

नांदेड परिमंडल ७७९ ६२४.३३

मराठवाडा एकूण ३२२१ २३७०.२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

Donald Trump: भारत-पाक संघर्ष मीच थांबविला

Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना

New Cooperative Societies: राज्यात सात हजार नव्या सोसायट्या स्थापन करा

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांचे दर २०० ते ३०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT