Electricity Theft : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वर्षभरात वीज चोरीची ४४२५ प्रकरणे उघड

Power Theft Prevention : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या वर्षभरात वीज चोरीची ४४२५ प्रकरणे उघडकीस आली.
Electricity Theft
Electricity TheftAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या वर्षभरात वीज चोरीची ४४२५ प्रकरणे उघडकीस आली. यात ग्राहकांनी ७ कोटी ८७ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ३५० प्रकरणांत वीज चोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे महावितरणने कळविले आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांत वीज चोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच प्रत्येक महिन्यात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना आहेत. ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागांतील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही आहेत. त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सलग काही दिवस केवळ वीज चोरीविरोधातील धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

Electricity Theft
Electricity Theft : वीजचोर आता महावितरणच्या रडारवर

वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा!

वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना महावितरणच्या वतीने वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते.वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या निर्धारित रकमेच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते.

वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येते. वीजचोरीची माहिती बंद पाकिटात लेखी स्वरूपात समक्ष कार्यकारी अभियंता यांना देऊन त्यांची पोच नागरिकांनी घ्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते.

मंडलनिहाय विजचोरीची प्रकरणे

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात एप्रिल-२०२४ ते मार्च-२०२५ या आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात ६५९, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात २७३४ तर जालना मंडलात वीजचोरीची १०३२ प्रकरणे उघडकीस आली. एकूण ४४२५ प्रकरणांत ग्राहकांना ७ कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली.

Electricity Theft
Jalna Electricity Theft : महावितरणची वीज चोरीप्रकरणी धडक कारवाई

ज्या ग्राहकांनी वीजचोरीची बिले भरलेली नाहीत, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात २, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात १६६ तर जालना मंडलात १८२ प्रकरणांत वीजचोरांवर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आल्याचे महावितरणाने कळविले आहे.

वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा.
-पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com