
Solapur News : महावितरणकडून शेती पंपाला वीजपुरवठा होणाऱ्या खांबावरील अॅल्युमिनियम तारांच्या वारंवार चोरीमुळे पाच- सहा गावांतील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. शेतीपंप बंद राहात असल्यामुळे पाण्यावाचून पिकांना फटका बसत आहे.
अकलूज पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या पूर्व भागातील माळीनगर, सवतगाव, महाळुंग, बिजवडी, लवंग या गावांत गेल्या दोन- तीन महिन्यांत शेतीपंपाला वीजपुरवठा करणाऱ्या सहा-सात डीपींवरून सुमारे ३० खांबांवरील तारा चोरीला गेल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
महावितरणकडून प्रत्येक चोरीची नोंद अकलूज पोलिस ठाण्यात केली जाते; परंतु पोलिसांनी एकाही चोरीचा तपास लावण्यात यश मिळवले नाही. किंबहुना, चोरीला गेलेल्या तारा महावितरणच्या असल्यामुळे की काय, विचारणारे कोणी नाही म्हणून तर चोरांचा शोध घेण्याच्या फंदात पोलिस पडत नाहीत, असेच दिसते. याबाबत पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना संपर्क साधला असता ते आजारी असल्याने माहिती मिळू शकली नाही.
रविवारी (ता. २) पुन्हा सवतगव्हाण हद्दीतील दोन शेतकऱ्यांच्या आठ खांबांवरील वीज वाहक तारा चोरीला गेल्याने शेतकरी आता काय करावे, या विचाराने अस्वस्थ झाले आहेत. चोरट्यांनी तारा चोरताना दिलेल्या ताणामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले विजेचे नऊ सिमेंटचे खांब मोडून पडले तर लोखंडी खांब वाकून जमिनीला टेकले आहेत.
सततच्या कुठे न कुठे वीज तारा चोरीला जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पोलिस पंचनामा झाल्यावरच वितरण कंपनी विजेचे खांब आणि तारा बसवून वीजपुरवठा सुरू करते. या प्रक्रियेत दोन-तीन आठवडे वेळ जातो. दरम्यान, पिके पाण्यावाचून धोक्यात येतात. अशा वारंवार चोरीमुळे शेतकरी खरोखरच हवालदिल झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.