Minister Dada Bhuse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांची वीज तोडू नये

शेतकऱ्यांना शेतीसाठी सलग सहा तास वीजपुरवठा पूर्ण दाबाने देण्यात यावा, जेणेकरून त्यांना शेतीला पाणी देता येणे शक्य होईल.

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्याशिवाय त्यांची वीज खंडित (Power Supply) करू नये. वीजबिल वसुली काही काळासाठी थांबविण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना वीजबिल (Electricity Bill) भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.

शेतकऱ्यांना शेतीसाठी सलग सहा तास वीजपुरवठा पूर्ण दाबाने देण्यात यावा, जेणेकरून त्यांना शेतीला पाणी देता येणे शक्य होईल. त्याचप्रमाणे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक येथे गुरुवारी (ता. २३) आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते.

आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, सुहास कांदे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे, धनंजय आहेर, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड, जयंतीलाल भामरे, संजय तडवी, रामराव राठोड, सतीश बोंडे आदी उपस्थित होते.

नवीन सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी मंजूर झाले आहेत तसेच ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ती कामे प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी नियोजन करण्यात यावे.

त्याचप्रमाणे प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या.

शेतीसाठी अखंडितपणे वीजपुरवठा करावा

शेती पिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये यासाठी शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करण्यात यावीत, असे निर्देश पाकलमंत्री दादा भुसे यांनी बैठकीत दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT