Election Commission Agrowon
ॲग्रो विशेष

Election Commission : निवडणूक आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम

Allegations Against the Ruling Party : सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत केला.

Team Agrowon

Mumbai News : विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते, पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत केला.

ऑनलाइन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आहेत, असा गंभीर आरोपही या वेळी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना खासदार अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह तीनही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की भाजप व त्यांचे सहकारी पक्ष पराभवाच्या भीतीने षड्‍यंत्र करत आहेत. निवडणूक आयोग मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप होता कामा नये. सरकारी योजनांची माहिती देण्याच्या नावाखाली राज्यात ५० हजार योजना दूतांना ५० हजार रुपयांवर नियुक्त केले असून, हे योजनादूत भाजपच्या विचारांचे आहेत, ते भाजपचा प्रचार करत आहेत.

जनतेच्या पैशाने सुरू असलेला हा भाजपचा प्रचार तत्काळ बंद करा. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती व त्यांना दिलेली मुदतवाढ ही असंविधानिक व बेकायदेशीर आहे, त्यांना हटविण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली. पण त्यांना बदलू शकत नाही, असे आयोग सांगतो. पण याच निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीवेळी मात्र तिथल्या पोलिस महासंचालकांना बदलले. पश्‍चिम बंगाल व महाराष्ट्रासाठी वेगळे कायदे आहेत का, असा सवालही केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात ‘मविआ’ला जास्त मते पडली त्या मतदार संघात साधारणपणे १० हजारांवर मते कमी करण्याचे षड्‍यंत्र सुरू आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले, की ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरातच मतदान करू देण्याचा निर्णय योग्य आहे, पण त्यात पारदर्शकता असली पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका घरातील पाच माणसांची नावे वेगवेगळ्या मतदार संघात दाखवली आहेत. मतदार यादीची प्रिंट अत्यंत खराब आहे, त्यात अनेक चुका आहेत. डिजिटल इंडिया म्हणता आणि मतदारयादी सुबक छापता येत नाही. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे सतेज पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT