Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : पुणे, शिरूर, मावळसाठी आज होणार मतदान

Pune Election Update : १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात समावेश असलेल्या पुणे, शिरूर व मावळ या लोकसभा मतदार संघांत आज (ता.१३) मतदान होत आहे.

Team Agrowon

Pune News : १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात समावेश असलेल्या पुणे, शिरूर व मावळ या लोकसभा मतदार संघांत आज (ता.१३) मतदान होत आहे. या मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्यात आले आहे. आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल.

निवडणुकीसाठी गेल्या एक महिन्यापासून आरोप-प्रत्यारोप, प्रचारसभांनी तापलेले प्रचाराचे वातावरण शनिवारी (ता.११) सायंकाळी पावसाच्या हजेरीत थंड झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, रमेश चेन्नीथला, अभिषेक मनु सिंघवी अशा दोन डझनांहून अधिक ‘पॉवरफुल’ नेत्यांच्या प्रचारसभांनी तोफा थंडावल्या. जाहीर सभा, रोड शो, मेळावे, त्यात नेत्यांकडून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराची सांगता झाली.

खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी, खासदार चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेचे नेते उदय सामंत, भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर, कॉंग्रेसचे नेते आमदार विश्‍वजित कदम, आमदार सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रा. नितीन बानगुडे पाटील, रोहित पवार, आदिती तटकरे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा विविध पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी प्रचाराच्या सांगता सभा, रॅलीमध्ये भाग घेतला.

...अशा झाल्या सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी रोड शो घेतला.

शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार यांची हडपसरमध्ये सभा

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवार, आदिती तटकरे यांची सभा

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी रमेश चेन्नीथला, अभिषेक मनू सिंघवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर मैदानात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT