Lok Sabha Election : मतदानामुळे शिरूर तालुक्यातील बाजार बंद

Shirur Election Update : शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता. १३) सुट्टी जाहीर केल्याने मुख्यबाजार शिरूर, उपबाजार तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप, पाबळ बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Agrowon
Published on
Updated on

Pune News : शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता. १३) सुट्टी जाहीर केल्याने मुख्यबाजार शिरूर, उपबाजार तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप, पाबळ बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक जाहीर केले असल्याची माहिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

बाजार समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की सर्व शेतकरी, अडतदार, खरेदीदार, वाहनचालक, हमाल, मापाडी, अधिकारी, कर्मचारी व सर्व बाजार घटक यांना परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे, की मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Lok Sabha Election 2024
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

३६ शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १३ मे २०२४ रोजी होणार असल्याने सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता सोमवारी (ता.१३) सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूरचे खालील प्रमाणे तपशिलात बाजार बंद राहतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूर कृषी बाजार समितीअंतर्गत बाजार बंद राहणार

ठिकाण ---- बाजार

मुख्यबाजार शिरूर --- भुसार (धान्य) मार्केट शेतकरी बाजार (तरकारी व भाजीपाला)

नवीन मार्केट यार्ड शिरूर --- कांदा मार्केट

उपबाजार तळेगाव ढमढेरे --- भुसार (धान्य) मार्केट शेळी मेंढी बाजार

उपबाजार पिंपळे जगताप --- तरकारी व भाजीपाला मार्केट

उपबाजार पाबळ --- तरकारी व भाजीपाला मार्केट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com