Nagar ZP Employee Society Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar ZP Employee Society : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला आठ कोटींचा नफा

ZP Society Update : नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८ कोटी ३४ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८ कोटी ३४ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला. ४ कोटी ५३ लाख रुपये आवश्यक त्या तरतुदी करून संस्थेला ३ कोटी ८१ लाख निव्वळ नफा झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र पालवे, उपाध्यक्ष दिलीप डांगे यांनी ही माहिती दिली.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभासदांना १७ लाख कर्ज मंजूर केले जाते. सभासदांच्या मुदत ठेवीवर ८ टक्के व्याजदर दिलेला आहे. संस्थेत मार्च २०२४ अखेर संस्थेची सभासद संख्या २६११ असून संस्थेचे वसूल भाग भांडवल २४.६७ कोटी, फंड्स १७.७३ कोटी, ठेवी १५९.५५ कोटी, सभासदांना कर्जवाटप १५४ कोटी असून अहवाल सालात सभासद कल्याण निधी मधून कन्यादान योजनेअंतर्गत ४२ सभासदांच्या मुलींच्या विवाहासाठी संस्थेमार्फत धनादेशाद्वारे प्रत्येकी ५ हजार रुपये कन्यादान योजनेचे लाभ दिलेला आहे.

तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या सभासद कुटुंब आधार विमा योजनेअंतर्गत ५ मृत सभासदांचे कायदेशीर वारसास रुपये १५ लाख प्रमाणे सभासद कुटुंब आधार विमा योजनेचा लाभ देण्यात आला. २०२४-२५ या वर्षासाठी १० लाखांचा अपघात विमा घेतला आहे, असे सांगण्यात आले.

संस्थेचे संचालक संजय कडूस, प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, श्रीमती ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, अर्जुन मंडलिक, श्रीमती सुरेखा महारनूर, श्रीमती मनीषा साळवे, दीपक गोधडे, नितीन चोथवे, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बारा टक्के लाभांश देणार

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे नेते संजय कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली सस्थेचा कारभार सुरू झाल्यापासून संचालकांनी खर्चात काटकसर, आवश्यक त्या तरतुदी करून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याबरोबरच सभासदांच्या कायम ठेवीवर ९ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा गतवर्षीपेक्षा एक टक्का अधिक लाभांश दिला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT