Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Watch by CCTV : काळाबाजार थांबवण्यासाठी सातारा जिल्हा उपनिबंधकांनी पावले उचलली असून, आता सातारा जिल्ह्यातील ९५३ सहकारी सोसायट्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
CCTV
CCTVAgrowon
Published on
Updated on

Karad News : गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी सर्वांत मोठी संस्था म्हणजे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आहे. या संस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार दर वर्षी केला जातो. त्या पारदर्शक व्यवहाराला मध्यंतरी काही संस्थाच्या संस्थाचालकांनीच बट्टा लावल्याचे उदाहरणे समोर आले. त्या पार्श्‍वभूमीवर काळाबाजार थांबवण्यासाठी सातारा जिल्हा उपनिबंधकांनी पावले उचलली असून, आता सातारा जिल्ह्यातील ९५३ सहकारी सोसायट्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

CCTV
Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

सहकारी सेवा सोसायट्या स्थापन होण्याअगोदर खासगी सावकारांकडून शेतकरी कर्ज घेत होते. त्यामुळे शेतकरी दर वर्षी सावकारी पाशात अडकलेला असायचा. त्याला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी गावोगावी सहकारी सेवा सोसायट्यांची स्थापना करण्यात आल्या. ग्रामीण भागांमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने या सोसायट्या शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहेत. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात विविध कार्यकारी सोसायटीचे योगदान मोलाचे ठरले आहे.

गावोगावच्या विकास सेवा सोसायट्या या गावच्या आर्थिक केंद्रे बनल्या आहेत. गावपातळीवर जिल्हा बॅंकांकडून या सोसायट्या कर्ज घेऊन त्याचे शेतकऱ्यांना वाटप केले जाते. पिकांच्या तारणावर कर्ज पुरवठा करणे, रोख रक्कम देण्याऐवजी बी-बियाणे, खते, जंतुनाशके इत्यादी वस्तूंचा पुरवठा करणे याचबरोबर शेतीमालावर उचल रकमा या संस्थांमार्फत दिल्या जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जनावरे खरेदी, कुक्कुटपालन, अवजारांसह काही सोसायट्या गोठा बांधण्यासाठीही कर्ज देतात.

CCTV
Farmers Co-operative Societies : छ. संभाजीनगर मधील डबघाईत गेलेली सहकारी संस्था विकण्याचे सरकारचे आदेश

पारदर्शकतेसाठी उपनिबंधकांचे आदेश

विकास सेवा सोसायट्या जरी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत असल्या तरी त्यातूनही काही जण राजकारण करतात. त्याद्वारे गावची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठीही अनेकदा प्रयत्न केले जात असल्याचीही उदाहरणे घडली आहेत. त्याचबरोबर काही वेळेला छुपी सावकारी, बोगस कर्ज प्रकरणे, मृत कर्जाची प्रकरणे केली जात असल्याच्याही सहकार विभागाकडे तक्रारी झाल्या आहेत. त्याचा विचार करून सहकार विभागाने आता आर्थिक पारदर्शकतेसाठी जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायट्यांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ९५३ सहकारी सेवा सोसायट्यांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सहकारी सोसायट्यांतील कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सर्व सोसाट्यांत सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या सहायक निबंधक, उपनिबंधकांकडून कार्यवाही सुरू आहे. त्याची कार्यवाही लवकरात लवकर होण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com