MP Dhairyasheel Mohite Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Fundkar Scheme: केळीचा समावेश फुंडकर योजनेत करण्यासाठी प्रयत्न करणार

MP Dhairyasheel Mohite Patil: सोलापूर येथे पार पडलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय केळी परिषदेत केळीचा फुंडकर फळबाग योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

सुदर्शन सुतार

Solapur News: ‘‘केळी पीक हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. अलीकडे सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत केळीचे क्षेत्र वाढत आहे. केळीचे क्षेत्र आणखी वाढण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत केळीचा समावेश करण्याबाबत आपण प्रयत्न करू,’’ असे आश्‍वासन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी (ता.२७) दिले.

महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या केळी परिषदेचे उद्‌घाटन खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब साठे, उद्योजक अमर पाटील, केळी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण, उपाध्यक्ष हनुमंत चिकणे, किशोर चौधरी सचिन कोरडे, पुरुषोत्तम पटेल, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील उपस्थित होते.

श्री. मोहिते पाटील म्हणाले, ‘‘केळीच्या साठवणूक योजनेसह काढणीपश्‍चात तंत्रज्ञानासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्याचा सर्वाधिक लाभ केळी उत्पादकांना मिळेल, असे आपण पाहू, पणन विभागातूनही मोठे साह्य केळीला मिळते. त्याचाही पाठपुरावा करू. पणनविभागाने केळीक्षेत्र असणारे विभाग, गावे निवडून, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केळीचे तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

महाधनचे योगेश म्हसे, यांनी खत व्यवस्थापन, तर डॉ. विद्या सोनवणे यांनी केळी व मानवी आरोग्य याविषयावर मार्गदर्शन केले. केळी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यात केळीचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करावा, शेलगाव (ता.करमाळा) येथे केळी संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी केली. या वेळी अमर पाटील, दादासाहेब साठे यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरुषोत्तम पटेल यांनी आभार मानले.

‘अॅग्रोवन’च्या गोपाल हागेंचा गौरव

राज्य केळी उत्पादक संघाच्या वतीने या परिषदेत दोन पत्रकारांना संभाजीराव चव्हाण आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार-२०२५ देण्यात आले. त्यात ‘अॅग्रोवन’चे अकोल्याचे जिल्हा प्रतिनिधी गोपाल हागे यांच्यासह पत्रकार विनायक पाटील (कुर्डुवाडी, जि. सोलापूर) यांना या वेळी खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Price Hike : युरिया-एलएनजी दरवाढीने वाढली चिंता; खत अनुदानाचा बोजा दुप्पट होणार?

Onion Farmers Protest: कांदा उत्पादकांचा आक्रोश, चांदवडमध्ये महामोर्चा, रस्त्यावर कांदे फेकले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Goat Farming Management: नियोजनबद्ध शेळीपालनात आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर

Livestock Methane Emission Management: पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणे अन् उपाय

Farmer Loan Waiver : तामिळनाडू सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; १४.२२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT