West Asia Crisis : पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि जागतिक स्तरावर खते व कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे देशातील खत अनुदानावर भार वाढवण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिली तर २०२७ या आर्थिक वर्षात खत अनुदानावरील एकूण खर्च ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे..केंद्र सरकारने अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी १.७१ लाख कोटी रुपये प्रस्तावित आहेत. म्हणजेच प्रस्तावित खर्चाच्या जवळपास दुप्पट खर्च अनुदानासाठी करावा लागण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मूज सामुद्रधुनीत पुरवठा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारताच्या खत आणि नैसर्गिक वायू आयातीवर मोठा परिणाम झाला आहे..तसेच जागतिक दरवाढीचा थेट परिणाम देशावर होत आहे. पश्चिम आशियातील तणाव वाढण्यापूर्वी खत अनुदानाचा खर्च २ लाख कोटींच्या आत राहील असा अंदाज होता. मात्र जागतिक बाजारातील दरवाढीनंतर हा खर्च झपाट्याने वाढला आहे..बिझनेसलाईन या वृत्तपत्राला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती खरीप हंगामभर कायम राहिली, तर खत अनुदान ३ लाख कोटींच्या पुढे जाऊ शकते. जर रब्बी हंगामापर्यंतही दरवाढ आणि पुरवठा अडचणी कायम राहिल्या, तर हा खर्च ३.५ लाख कोटींच्या घरात जाईल, अशी शक्यता असल्याचे सांगितले आहे..Fertilizer Stock : खरीप हंगामासाठी खतांचा २०० लाख टनांहून अधिक साठा; केंद्र सरकारचा दावा .अलीकडील तणावाच्या अवघ्या ४० दिवसांच्या कालावधीत जागतिक युरिया दरात सुमारे ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२६ अखेरीस प्रति टन सुमारे ४८२ डॉलर असलेला युरिया एप्रिलच्या सुरुवातीला जवळपास ७९५ डॉलरपर्यंत पोहोचला. भारतीय पोटॅश लिमिटेडच्या अलीकडील आयात निविदेत हे दर आणखी वाढून ९३५ ते ९५९ डॉलर प्रति टन झाले आहेत..युरिया उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या एलएनजीच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी अखेरीस प्रति सुमारे १०.४ डॉलर असलेला एलएनजी दर मे २०२६ च्या सुरुवातीला १७.४ डॉलरपर्यंत गेला. मार्चच्या सुरुवातीला तो तब्बल २५.४ डॉलरपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते..दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी १.७० लाख कोटींची तरतूद केली होती. यामध्ये युरिया क्षेत्रासाठी १.१६ लाख कोटी आणि फॉस्फरस व पोटॅश क्षेत्रासाठी ५४ हजार कोटींचा समावेश होता. यापूर्वी २०२५-२६ मध्ये खत अनुदानाचा सुधारित अंदाज १.८६ लाख कोटी इतका होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.