Tamil Nadu Government Waives Cooperativev : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी (ता.२५) राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीककर्जावर मोठा दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या योजनेचा लाभ तब्बल १४.२२ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे २ हजार ४४ कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले..शेतीचा वाढता खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. तामिळनाडू मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सहकारी बँकांकडून घेतलेल्या ५० हजार रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती दिली..अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसरकारच्या घोषणेनुसार, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. तर मोठ्या शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज असल्यास त्यातील ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..टीव्हीके नेते आणि मंत्री सीटीआर निर्मलकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात सुमारे १६ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले होते. त्यापैकी १४ लाख २२ हजार शेतकऱ्यांची कर्जे या निर्णयांतर्गत माफ करण्यात आली आहेत..Bank Crop Loan Delay: पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे.निवडणूक आश्वासनाची पूर्ततानुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरला होता. २३ एप्रिल रोजी प्रचारादरम्यान मुख्यमंत्री विजय आणि त्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर आता त्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सरकारचा विश्वास वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे..कोणत्या कर्जांना लाभ?राज्य सरकारच्या माहितीनुसार, १ मे २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सहकारी बँकांकडून घेतलेली पीककर्जे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे आगामी पेरणी हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेणे आणि शेती सुरू ठेवणे सोपे होणार आहे..Crop Insurance Policy: ‘एल निनो’ आणि पीकविमा संरक्षण .५० हजारांपेक्षा जास्त कर्जासाठीही दिलासातमिळनाडू सरकारने ५० हजारांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही टप्प्याटप्प्याने सवलतीची तरतूद केली आहे.यामुळे कमी आणि मध्यम स्वरूपाचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना तुलनेने अधिक लाभ मिळणार आहे..सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जमाफीची रक्कम सरकारने ४५ ते ६० दिवसांच्या आत बँकांना अदा करणे आवश्यक आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती, महसुलावरील ताण आणि उपलब्ध निधी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.