IAS Jitendra Dudi Agrowon
ॲग्रो विशेष

Economic Empowerment: शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न

Agriculture Development: बारामती जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

Team Agrowon

Baramati News: बारामती जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

कृषी विभाग, आत्मा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदर्श अंजीर उत्पादन पद्धती व निर्यात’ प्रशिक्षण सत्रास दिलेल्या भेटीप्रसंगी ते मंगळवारी (ता. २२) बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. धीरज शिंदे, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, की जिल्ह्यात दिशा कृषी उन्नतीची २०२९ हा आराखडा पुढील पाच वर्षांत राबविण्यात येणार आहे. उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल करडई निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार आहे.

सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ, निर्यातसाखळी तयार करणे यातून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत प्रथम शेतकऱ्यांची निवड करून त्यांना कृषी विभाग आणि आत्माच्या मदतीने प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करणार आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावात एक मास्टर प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात यावी, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT