Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : पावसाच्या अतिरेक भाजीपाल्यावर परिणाम, कांदा- लसूण दरात तेजी

Garlic Rate : गेल्या महिन्यात लसणाचे भाव अगदी दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो असा घसरला होता. महिनाभरात आवक कमी झाली आणि पुन्हा दराने उसळी मारली.

sandeep Shirguppe

Vegetables Rate : आवक कमी झाल्याने बाजारात कांदा, लसणाला चांगला दर मिळत आहे. लसणाचे दर ३५० ते ४०० रुपये झाले आहेत तर कांद्यानेही चाळीस ते पन्नास रुपयांचा प्रतिकिलोचा भाव गाठला आहे. मेथीच्या दरातही चांगली तेजी पहायला मिळत आहे तर काही दिवसांपूर्वी कवडीमोल भावात विकली जाणारी कोथिंबीर पुन्हा महागली आहे. पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. तर स्वीटकॉर्नची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. वीस रुपयांना तीन नग असा लिंबूचा भाव सुरू आहे.

गेल्या महिन्यात लसणाचे भाव अगदी दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो असा घसरला होता. महिनाभरात आवक कमी झाली आणि पुन्हा दराने उसळी मारली. तर श्रावण महिन्यात उपवासामुळे पालेभाज्यांची मागणी अधिक आहे. त्यातच अतिवृष्टीचा पालेभाज्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वांगी, दोडका, गवारी, पडवळ, भेंडी, कारली, दुधी भोपळा, ढब्बू मिरची आदींचे दर ४० ते ५० रुपयांवर आहेत.

स्वीटकॉर्नची आवक वाढली

एरवी स्वीटकॉर्नचे दर वीस ते पंचवीस रुपये नगाला मोजावे लागतात. आज मात्र, एका स्वीटकॉर्न कणसाचा दर ७ ते १० रुपये असा घसरला आहे. बाजारात विक्रीसाठी, अनेक ठिकाणी ढीग लागले आहेत. ग्राहकांकडून त्याला मागणीही आहे.

पालेभाज्यांचे दर

(प्रति पेंडी रुपयांत)

मेथी ३० ते ४०, शेपू १०, पालक १०, कांदापात १०, मुळा १० रू नग, पुदीना १०, पोकळा २०, कोथिंबीर ४० ते ६०,

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे दर (रुपयांत)

वांगी ६०, दोडका ६०, गवारी ८० ते १००, पडवळ २० रू नग, भोपळा १० ते २० रू. फोड, घेवडा ६० ते ७०, टोमॅटो २०, ओली मिरची ६० ते ८०, काकडी ६०, भेंडी ६०, बिनीस ९०, कोबी १५ ते ३०, फ्लॉवर २० ते ५०, शेवगा २० रू. तीन नग, ढब्बू मिरची ६०, हिरवा टोमॅटो ३०, गाजर ६०, वरणा ६० ते ८०, कांदा ४० ते ६०, बटाटा (इंदोरी) ४५ ते ५५, बटाटा ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT