Educational Loan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Educational Loan Scheme : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना

Shetkari Aatmhatya : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील बारावी उत्तीर्ण मुलामुलींचे पदवी शिक्षण आता अर्धवट राहणार नाही. त्यांना आता शिखर बॅंकेच्या नव्या योजनेतून १५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळेल.

Team Agrowon

Pune News : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील बारावी उत्तीर्ण मुलामुलींचे पदवी शिक्षण आता अर्धवट राहणार नाही. त्यांना आता शिखर बॅंकेच्या नव्या योजनेतून १५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळेल. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला येत आहे.

या योजनेला ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ असे नाव देण्यात आले आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी जामीन नसेल. मात्र, पाच ते दहा लाखांसाठी एक जमीन, तर दहा ते पंधरा लाखांच्या दरम्यान कर्जासाठी दोन जामीनदारांची आवश्यकता असेल.

विद्यार्थी स्वतः व आईच्या स्वाक्षरीने या योजनेसाठी अर्ज करू शकतील. ही कर्ज योजना २००३ ते २०२३ या कालावधीतील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांसाठी आहे. ती सर्व जिल्ह्यातील सर्व जाती, धर्मातील शेतकऱ्यांना लागू असेल.

या योजनेतून शिकणारा विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यास ५० हजार रुपये, तर ९० टक्के गुण मिळाल्यास एक लाखाच्या बक्षिसाला पात्र राहील. मात्र, विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती व अनुदानापोटी प्राप्त झालेली रक्कम कर्जापोटी बॅंकेकडे जमा करणे अपेक्षित आहे.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी योजनेस पात्र असतील. शासकीय, स्वायत्त, खासगी संस्थेत किंवा विदेशात शिक्षण घ्यायचे असले तरी योजनेचा लाभ मिळेल. मात्र, कर्जरक्कम थेट शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा केली जाईल.

अत्यावश्यक कागदपत्रे

सातबारा,बारावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र, शिक्षणाचे प्रवेशशुल्काचे तपशील, पित्याची आत्महत्या झाल्याचा तहसीलदाराचा दाखला, पोलिस पंचनामा, जिल्हाधिकारी समितीकडील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी, सरपंच, ग्रामसेवक किंवा पोलिस पाटलाचा दाखला, एकल माता (पालक) असल्याची नोंद, वार्षिक उत्पन्नाचा तलाठ्याचा किंवा तहसीलदाराचा दाखला, आई, विद्यार्थ्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड (असल्यास), वीजबिल, नोकरीवर रुजू होताच बॅंकेला कळविण्याचे हमीपत्र, विविध कार्यकारी सोसायटीचा कर्ज थकबाकी दाखला.

...अशी असेल योजना

व्याजदर - ० ते चार टक्के, पाच लाखापर्यंत शून्य टक्के, ५ ते १० लाख दोन टक्के, १० ते १५ लाख ४ टक्के.

कर्जफेड काळ - १० वर्षांचा. शिक्षण पूर्ण होताच १२ महिन्यांनी हप्ते सुरू होतील.

तारण व सहतारण - पाच लाखापर्यंत जामीनदार नाही. विद्यार्थ्याचा मुदतविमा घेणार.

शेतकरी आत्महत्या हा मला सतत अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षण थांबू नये, ही अशी शिखर बॅंकेची भूमिका आहे. ही योजना या मुलामुलींसाठी वरदान ठरेल.
विद्याधर अनास्कर, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT