Edible Oil Rate agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Rate : खाद्यतेल किलोला ४ रुपयांनी वाढ, भाजीपाला आणि कडधान्यांचे दर २० टक्‍क्यांनी घसरले

Vegetables Rate : कोथींबीर, मेथी, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता परंतु झालेल्या पावसाने आवक चांगली झाल्याने दर २० टक्क्यांनी उतरले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetable Market : समाधानकारक पाऊस होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होत आहे. आठवडा बाजारात वाढलेल्या भाजीपाल्याचे दर काहीशे कमी झाले आहेत. कोथींबीर, मेथी, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता परंतु झालेल्या पावसाने आवक चांगली झाल्याने दर २० टक्क्यांनी उतरले आहेत. हंगामी श्रावण घेवडा, वाल घेवड्याची नवीन आवक सुरू झाली आहे, तर मुळाही बाजारात दाखल झाला आहे. तसेच रानभाज्याही बाजारात काही अंशी पहायला मिळत आहेत.

सध्या बाजारात फळांची आवक कमी आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बाजारात येताना पहायला मिळत आहेत. परराज्यातून दशेरी, तोतापुरी, लंगडा आंबा बाजारात विक्रीसाठी आहे. तर फूलबाजारात झेंडूचा भाव कमी झाला आहे. इतर फुलांचे भाव मात्र वाढलेले आहेत. खाद्यतेल बाजारात अनेक दिवसांनी कमालीची वाढ झाली आहे. तेलाचा तुटवडा असल्याने किलोला ३ ते ४ रुपयांची कमाल वाढ झाल्याने विक्रेत्यांनी सांगितले. काही दिवस मागणी कमी असल्यामुळे दरावर फारसा परिणाम दिसला नाही.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला

टोमॅटो- ४० ते ५०, दोडका- ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची - ६० ते ८०, फ्लॉवर - ५० ते ६०, कोबी- ३० ते ४०, बटाटा - ४० ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- १२० ते १५०, गवारी - ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, दुधी - ३० ते ४०, पालेभाज्या - १० ते १५ पेंढी, कोथिंबीर- १० ते १५, मेथी - २०, कांदापात - २५, शेवगा - ८ ते १० रुपये नग

फुले

झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - २५०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १५० ते १६०.

फळे

सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८० ते १००.

खाद्यतेल

सरकी - ११२ ते ११५, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - ११२ ते ११५, पामतेल - १०५ ते ११०, सूर्यफूल - ११० ते ११५.

कडधान्य

हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तूरडाळ- १६० ते १७८, मूगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसूर- ७० ते ७५, फुटाणाडाळ - ८३ ते ८६, चवळी- १०० ते १२०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोले -१२० ते १५०.

धान्यबाजारात घसरण

कडधान्ये, डाळींच्या वाढलेल्या दरात घसरण होत आहे. पुरवठा चांगला असताना, मागणी फार कमी झाल्याने दर कमी होत आहेत. मूगडाळ, मसूरडाळ, मूग, मटकी, मसूर, फुटाणाडाळ, चवळी, हिरवा वाटाणा, छोले आदींच्या दरात किमान व कमाल उतरण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT