ED Action in Maharashtra Agrowon
ॲग्रो विशेष

ED Action in Maharashtra : बीडच्या सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरीवर ईडीची कारवाई; ३३३ कोटींची मालमत्ता जप्त

ED Attach Property : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक रंगात आली असतानाच अमंलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. प्रचारसभांतून महायुती आणि महाविकास आघाडीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर कारवाई केली आहे. यात ३३३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर याप्रकरणात बीडच्या सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरीवर ईडीने कारवाई केली आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. सर्वच पक्ष आप आपल्या प्रचारात गुतंले आहे. यादरम्यान बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

तसेच या प्रकरणात ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ईडीने केलेल्या कारवाईत सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी सध्या कारागृहात आहेत. तर या कारवाईत सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मालमत्ताही ईडीने जप्त केल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीत मोठा अपहार झाला होता. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी २३१८ कोटी रुपयांचा अपहार करत रक्कम कर्ज रूपाने दुसरीकडे वळवली. तर त्याच रक्कमेतून वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर ही बाब तपासातून उघड झाली आहे. याप्रकरणात मनी लॉड्रिग झाल्याचे सिद्ध झाल्याने ईडीने कारवाई सुरू केली होती.

दरम्यान या अपहाराप्रकरणी जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल झाले असून सोसायटीच्या राज्यासह देशभरात ५० शाखा आहेत. तर ३ लाख ७५ हजारहून अधिक ठेवीदारांच्या ३ हजार कोटींहून अधिक ठेवी अडकल्या आहेत. याप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यातच कारवाई करत सोसायटीची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी १ हजार २ कोटी ७९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT