ED On Jayant Patil Update : जयंत पाटलांची ईडी चौकशी, राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून निदर्शने

ED inquiry of Jayant Patil : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यभरातून कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयासमोर जमा झाले असून ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे.
Ncp worker
Ncp worker agrowon

Jayant Patil News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर राज्यभरातून कार्यकर्ते जमा असून ईडीच्या विरोधात निदर्शने करीत आहेत.

दरम्यान, ईडी चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांनी ट्वीट केलं आहे. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे

Ncp worker
भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय ः जयंत पाटील

जयंत पाटील सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. सकाळीपासून कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ईडीच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. दरम्यान, ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनाद केला आहे.

Ncp worker
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘ईडी’चा जामीन मंजूर

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यांनी एक आठवडण्याची मुदत मागितली होती. त्यानंतर ईडीने दुसरे समन्स बजावून दि. २२ रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता ते ईडी कार्यालयात हजर झाले.ईडी कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी जयंत पाटील यांनी ट्विट केले.

'ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे,

“माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे”, अअसं जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले.

जयंत पाटील यांच्यावरील या कारवाईनंतर सातारा, सांगली, पुणे, संभाजीनकर आणि नाशिकमध्ये राष्ट्रावादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी हातामध्ये बॅनर घेऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com