Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Sapling Rate : संत्रा कलमांचे दर कमी झाल्यामुळे आर्थिक फटका

Economic Impact : गेल्या काही वर्षांपासून रोपांच्या मागणीत घट झाल्याने दरही दबावात आले आहेत. परिणामी, उत्पादन खर्चाची भरपाई होत नसल्याची माहिती रोपवाटिकाधारकांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : वरुड तालुक्‍यातील शेंदूरजनाघाट परिसर लिंबूवर्गीय कलमाच्या उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून रोपांच्या मागणीत घट झाल्याने दरही दबावात आले आहेत. परिणामी, उत्पादन खर्चाची भरपाई होत नसल्याची माहिती रोपवाटिकाधारकांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन तालुके संत्रा, मोसंबी लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. भौगोलिक स्थितीमुळे या भागात लिंबूवर्गीय पिकांची उत्पादकता चांगली राहते. त्यामुळेच या भागात संत्रा रोपवाटिकांच्या माध्यमातून कलम निर्मितीचा व्यवसायही नावरूपास आला आहे. गेल्या ७५ वर्षांपासून संत्रा कलमा निर्मितीचा व्यवसाय या भागात होतो.

खात्रीशीर कलमांचे माहेरघर म्हणून शेंदूरजनाघाट नावरुपास आले आहे. मध्य प्रदेश राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्‍चिम महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत या भागांतील कलमांचा पुरवठा होतो. या परिसरात अधिकृत परवानाधारक रोपवाटिकाधारकांची संख्या २२० आहे. त्यासोबतच अनधिकृत रोपवाटिकाधारकांचेही प्रमाण मोठे आहे.

हंगामात कलमाच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल शेंदूरजनाघाट परिसरात होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मात्र रोपांना मागणी घटल्याने दरही दबावात आले आहेत. या वर्षी सरासरी ३० रुपये प्रति रोप याप्रमाणे दर राहिले. बियाणे टाकतेवेळी ते जवळ जवळ टाकले जाते. ४ इंच बाय २ इंच असे हे अंतर राहते.

परिणामी, पुर्नलागवड ९ बाय ९ इंच लागवड करावी लागते, असे अनेक बारकावे जपावे लागतात. त्यामुळे उत्पादकता खर्च वाढतो. रोपांच्या दर्जावर भर दिला जातो. याच एका कारणामुळे देशभरातून या भागातील रोपांना मागणी राहते, असे रोपवाटिकाधारक विवेक फुटाने यांनी सांगितले.

जंबेरीच्या खुंटावर डोळा बांधला जातो. त्याकरिता बी टाकल्यानंतर जुलैपर्यंत त्याचे संगोपन करावे लागते. त्यानंतर रोप दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर करावे लागते. ९ महिने रोप तयार करण्याचा कालावधी आहे. बी टाकण्यापासून पावणेदोन वर्षाचे झाड विक्रीयोग्य राहते. या संपूर्ण काळात मशागत, खत, पाणी, फवारणी, तणनियंत्रण अशा बाबींवर खर्च होतो.

संत्रा रोपाचा दर ६० रुपये असला तर हा व्यवसाय फायद्याचा ठरतो. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दर दबावात आहेत. ३० रुपये प्रति रोप असा दर मिळत आहे. त्यातून उत्पादकता खर्चाची भरपाई होत नाही.
विवेक फुटाणे, रोपवाटिकाधारक, शेंदूरजनाघाट, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drinking Water Management: टंचाईग्रस्त भागातही पाणी पोहोचविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Farmers Protest: पीकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा चाबूक आपटत ‘ठिय्या’

Illegal Organic Fertilizer: वेंगुर्ल्यात विनापरवाना सेंद्रिय खतावर भरारी पथकाची कारवाई

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभूचे उन्हाळी आवर्तन बंद; ६० ठिकाणचे शेतकरी पाण्याविना

SCROLL FOR NEXT