Pune News: महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला प्राध्यापक दर्जाचा पूर्णवेळ संचालक मिळत नसल्यामुळे कामकाजात अडथळे तयार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कृषी परिषदेच्या शिक्षण संचालकपदाची सूत्रे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. यशवंत साळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. .तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. किशोर शिंदे यांच्याकडे संशोधन संचालकपदाची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे दोघेही संचालक प्रभारी आहेत. विस्तार, शिक्षण व साधनसामग्री विभागाच्या संचालकपदावर पूर्णवेळ नियुक्ती झाली आहे. या पदावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. धीरजकुमार कदम कार्यरत आहेत..Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त.कृषी विद्यापीठ कायद्याच्या परिनियम १९९० नुसार परिषदेच्या संचालकपदी प्राध्यापक किंवा त्यावरील दर्जाच्या व्यक्तीची नियुक्ती अपेक्षित आहे. परिषदेत संचालकांसह विविध एकूण ४१ पदे आहेत. त्यातील २२ पदे रिक्त आहेत. परिषदेचा संचालकच विद्यापीठातील संचालकाच्या पात्रतेचा नाही. विद्यापीठेदेखील परिषदेला जुमानत नसल्याचे सांगितले जाते..VNMKV Vacancies: ‘वनामकृवि’तील महाविद्यालयांत शिक्षकांची २५३ पदे रिक्त.परिषदेला मनुष्यबळ विद्यापीठांकडून प्रतिनियुक्तीवर पुरवले जाते. विद्यापीठांकडे पुरेसे प्राध्यापक नसल्याने परिषदेलाही पूर्णवेळ संचालक मिळत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एका माजी संचालकाने सांगितले, की परिषद अकारण नियंत्रक म्हणून काम करते. नियंत्रक यंत्रणेला मनुष्यबळ पुरवून कशासाठी बळकट करायचे, अशी भावना विद्यापीठांची असते..कृषी विद्यापीठे स्वतःचे कर्मचारी कृषी परिषदेला देण्यास उदासीन असतात. त्यामुळे कृषी विभागाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तुषार पवार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.