Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : सुलभ यांत्रिकीकरण, शेतीमालावर प्रक्रियेला महत्त्व

Agriculture Processing : आजवर आपण शेतीला व्यवसाय म्हणून समजत नव्हतो. परंतु आता नवा विचार आपल्याला आणावा लागेल.

 गोपाल हागे

Akola News : आजवर आपण शेतीला व्यवसाय म्हणून समजत नव्हतो. परंतु आता नवा विचार आपल्याला आणावा लागेल. शेतीसमोरील विविध आव्हाने पाहता कृषीमध्ये अधिकाधिक सुलभ यांत्रिकीकरण, उत्पादित मालावर प्रक्रिया खूप महत्त्वाची झाली आहे, असे मत अखिल भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (नवी दिल्ली) कृषी अभियांत्रिकी उपमहासंचालक तथा कृषी अभियंते राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान व कृषीमध्ये उद्योजकता विकास’ या राष्ट्रीय परिषदेचे गुरुवारी (ता. ७) डॉ. झा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. या वेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक डॉ. श्‍यामसुंदर माने, डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्‍थित होते.

डॉ. झा म्हणाले, की सध्या शेतीत जे राबत आहेत, त्यांची नवी पिढी या क्षेत्रात येण्याची शक्यता नाही. ही पिढी शेतीऐवजी सेवा क्षेत्राकडे आकर्षित झाली आहे. शेतीवरील अवलंबित्व कमी होत आहे. त्यामुळे आज जे राबत आहेत, ते सन २०४७ पर्यंत वयोवृद्ध झालेले असतील. तेव्हा राबणाऱ्यांमध्ये महिलांचेच प्रमाण अधिक असेल. अशा स्थितीत शेतीत यंत्र वापरावर अधिक जोर देणे आवश्‍यक आहे.

यासाठी सुलभरीत्या वापरता येतील असे यंत्र, तंत्र शोधून त्याचा वापर वाढवावा लागेल. यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव स्तरावर प्रशिक्षित इंजिनिअर असावेत. आपण यंत्रे शोधत आहोत, पण त्याचा योग्य वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले नाही तर त्यांचा वापर होऊ शकणार नाही, हे काही ठिकाणी दिसून आले.

(ॲग्रो विशेष)

ओडिशा, तमिळनाडू सारखी राज्ये यांत्रिकीकरणात पुढे निघाली आहेत. महाराष्ट्र यात मागे का पडला याचे आश्‍चर्य वाटते. राज्य सरकारने यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचा सल्ला देत त्यांनी सन २०४७ पर्यंत शेतीत किमान ७५ टक्के यांत्रिकीकरण झाले पाहिजे. यादृष्टीने शासनाला प्रस्ताव दिला असल्याची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गडाख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh) कृषी विद्यापीठाने यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. पंदेकृवि डाळ मिल, विविध फळांच्या प्रक्रियेसाठी शोधलेली यंत्रे, विद्यापीठ करीत असलेल्या विविधांगी कामांचा आढावा सांगतानाच सध्याच्या संशोधनाची दिशासुद्धा स्पष्ट केली.

या वेळी कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता तथा परिषदेचे संयोजक डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी प्रास्ताविकात या राष्ट्रीय परिषदेचा उद्देश सांगितला. डॉ. माने, डॉ. खर्चे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अनुष्का, गौरी या विद्यार्थिनींनी केले. तर जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले. दोन दिवशीय परिषदेत विविध विषयांवर वेगवेगळ्या सत्रात विचारमंथन, पेपर सादरीकरण होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT