Agriculture Processing : शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगांवर भर द्या

Agribusiness : शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांवर अधिक भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Jalna News : शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांवर अधिक भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांच्यावतीने पाच दिवसीय गोदा समृद्धी जालना कृषी महोत्सवाचे कलश सिडस मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ शुक्रवारी (ता. १) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Agriculture
MPSC Agricultural Services : कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांच्या लढ्याला यश, सरकारकडून नियुक्ती पत्राचे आदेश

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, की शासनाची बांबू लागवडीसाठी अडीच एकरासाठी ७ लक्ष रुपयांची अनुदान योजना आहे. रेशीम शेतीमध्ये ४ लक्ष रुपयांचे अनुदान मिळते. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेकानेक योजना शासनाकडून राबविण्यात येत असून आपणास अनुकूल अशा योजनेची निवड करुन त्या योजनेचा फायदा घ्यावा.

बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय चालु केल्याने उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांनी उद्योजकप्रमाणे विचार करणे गरजेचे झाले आहे. बांधावर चिंच अथवा इतर लागवड करुन आपले उत्पन्न वाढवावे.

Agriculture
Agriculture Irrigation : ‘डिंभे’च्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला

वर्षा मीना म्हणाल्या, आपली अर्थव्यवस्था ही कृषी व कृषी संबंधित उद्योगांवर आधारित आहे. प्रगत शेतीसाठी अशा कृषी महोत्सवाची आवश्यकता आहे. विभागीय कृषी उपसंचालक डॉ. तुकाराम मोटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आत्माचे श्री. शिंदे यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी कृषी महोत्सवात उभारण्यात स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

कृषी महोत्सवाचे दोनदा उद्‌घाटन

अनेकदा पुढे ढकलला गेलेला कृषी महोत्सव अखेर शुक्रवारपासून (ता.१) सुरू झाला. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले होते. परंतु शनिवारी (ता. २) पुन्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ज्यांचे मुख्य पत्रिकेत नाव होतं ते आले आणि त्यांच्या हस्तेही शनिवारी पुन्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाची फीत कापली गेली. मुख्य पत्रिकेत पालकमंत्र्यांचेही नाव होतं. आता त्यांनी तिसऱ्यांदा येऊन कृषी महोत्सव कसा चालला ते पाहावं पण फीत कापू नये म्हणजे झालं, अशी मिश्किल चर्चा या निमित्ताने रंगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com