Earthquake  Agrowon
ॲग्रो विशेष

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गुजरातच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा आणि मोठा कडवण भागांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या तीन दिवसापासून भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरीक भीतीच्या छायेखाली आले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील खोकसा आणि मोठा कडवण भागांमध्ये शुक्रवारी (ता.४) रात्री १० ते ११.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हा २.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. गेल्या दोन ते तीन दिवसापासून येथे भूकंपाचे धक्क्यांसह भूगर्भातून आवाजही येत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे पसरली आहे. तर नागरिक भीतीमुळे घरात न झोपता उघड्यावर रात्र काढत आहेत.

भूकंपाचे धक्के आणि भूगर्भातून आवाजाची माहिती मिळाल्यानंतर नवापूर तालुक्यातील गावांना काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी, माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, तहसीलदार दत्तात्रय जाधव आदींनी गावात जाऊन पाहणी केली. तसेच येथे भूगर्भ शास्त्र विभागाचे काही अधिकारी दाखल झाले आहेत.

नवापूर तालुक्यातील खोकसा, कोटखांब, कामोद, नागझरी, सरी, बोरझर, करंजी बु अशा भागांनामध्ये गेल्या दोन दिवसापासून जंगलातून विचित्र आवाज येत आहेत. येथील जंगलातून मोठे आवाज येत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. यानंतर आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश वसावे, विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

यावेळी जंगलातून नेमका आवाज कसला येत आहे, याची शहानिशा करून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार गोवाल पाडवी यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच आमदार पाडवी यांनी नागरिकांना धीर देताना, घाबरू नका, उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.

अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

दरम्यान गेल्या महिन्याच्या ३० तारखेला अमरावती जिल्ह्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. रविवारी (ता. २९) रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. यामुळे देखील लोक घाबरले होते. तर मोकळ्या जागेत रात्रीच अनेकांनी धाव घेत रात्र घराबाहेर काढली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

SCROLL FOR NEXT