चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के agrowon
ॲग्रो विशेष

Earthquake Chandoli Dam : चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का, 8 किलोमीटरचे क्षेत्र हादरलं

Sangli Chandoli Dam : शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर क्षेत्रात या भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

sandeep Shirguppe

Chandoli Dam Earthquake : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली धरणात जोरदार पाऊस होत आहे. अशातच धरण परिसरात आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.

शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर क्षेत्रात या भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धुवाँधार पाऊस आणि भूकंपाच्या धक्के बसल्याने चांदोली परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चांदोली धरणाचे काल(ता.२४) दुपारी दोन वक्री दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंप झाला. मागच्या ४ दिवसांत चांदोली धरण क्षेत्रात मोठा पाऊस सुरू आहे. धरणासाठ्यात मोठी आवक सुरू असल्याने धरणातून विसर्गही सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंपाचे हादरे जाणवले. त्यादृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली.

पाऊस सुरु असल्याने चांदोली धरणाच्या पातीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासनाने नागरिकांना अश्वस्त केलं आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने कसलाही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात देखील अशाच भूकंपांची नोंद झाली आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना या चार जिल्ह्यांमध्ये ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. हवामान विभागाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी भूकंप आणि पाऊस यांचा संबंध सांगितला आहे. जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात तेव्हा जास्त पावसाची शक्यता असते, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT