Union Budget 2024 : अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टिका तर सत्ताधाऱ्यांकडून कौतूक

Reaction on Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया.
Narendra Modi | Rahul Gandhi | Shivraj Singh Chouhan
Narendra Modi | Rahul Gandhi | Shivraj Singh ChouhanAgrowon
Published on
Updated on

Budget Update :

अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला शक्ती देणारा आहे. ग्रामीण भागातील गरिबांना समृद्धीच्या वाटेवर नेणारा आहे. मागील दहा वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर निघाले आहेत. युवकांना असंख्य नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शिक्षण आणि कौशल्य विकासाला या अर्थसंकल्पातून एक नवी गती मिळेल. मध्यम वर्गाला शक्ती देणारा अर्थसंकल्प आहे. दलित आणि वंचितांना सशक्त करणाऱ्या नव्या योजनांसह हा अर्थसंकल्प समोर आला आहे.

तसेच या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधा आणि उत्पादनावर लक्ष देण्यात आले आहे. यातून आर्थिक विकासाला नवी गती मिळेल आणि गतीमध्येही सातत्य राहील. रोजगार आणि स्वयंरोजगाराचे अभुतपूर्व संधी निर्माण होईल, हीच आमची ओळख राहिली आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Narendra Modi | Rahul Gandhi | Shivraj Singh Chouhan
Union Budget 2024 : शेतीसाठी शब्दांचा फुलोरा!

सर्वसामान्य नागरिकांना निराश करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागील अर्थसंकल्पाची ही पुनरावृत्ती आहे. या अर्थसंकल्पाचा ‘एए’ (अदानी-अंबानी) ला फायदा होईल तर सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा नाही.

बिहार आणि तेलंगणासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावरूनही विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. हा ‘खुर्ची बचाव’ अर्थसंकल्प असून इतर राज्यांच्या जीवावर मित्रांना खूष करणारा हा अर्थसंकल्प आहे.

राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

केंद्रीय अर्थसंकल्प हा २०४७ मध्ये विकसित भारत घडविण्यासाठी टाकण्यात आलेले भक्कम पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.

यात शेतकरी, युवा, महिला व समाजातील सर्व घटकांचा विचार केला आहे. २०४७ मध्ये भारताला विकसित भारत घडविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पात दमदार पावले उचलेली आहेत.

शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com