Cotton Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : गेवराई तालुक्यात कपाशीची ४५ हजार हेक्टरवर लागवड

Kharif Sowing : यंदा मॉन्सूनपूर्व सर्वदूर तर मॉन्सूनच्या पावसाने गेवराई तालुक्यात काही भागांत हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, खरीप पेरणीच्या कामाला लागला आहे.

Team Agrowon

Beed News : यंदा मॉन्सूनपूर्व सर्वदूर तर मॉन्सूनच्या पावसाने गेवराई तालुक्यात काही भागांत हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, खरीप पेरणीच्या कामाला लागला आहे. आतापर्यंत तालुक्यात १ लाख ३५ हजार हेक्टरपैकी ४५ हजार हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. मात्र आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जिरायत शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला थांबा दिला आहे.

गेवराई तालुक्याचे एकूण १ लाख ४६ हजार ५४० हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. पेरणीयोग्य १ लाख ३४ हजार ७३४ हेक्टर क्षेत्र आहे. यात साधारण सवा लाखाहून आधिक हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या क्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढल्याने घट होण्याची शक्यता आहे. गेवराई तालुक्यात कपाशी, सोयाबीन आणि तूर अन् त्यापाठोपाठ मुगाला पसंती शेतकरी देत आहेत.

दरम्यान, मे मध्ये झालेल्या व मृगाच्या एक दिवसाच्या पावसावर शेतकरी पेरते झाले. आतापर्यंत जवळपास ५१ हजार ७४१ हेक्टरवर खरीप पेरणी झाली असून, यामध्ये सर्वाधिक ४५ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. आता मात्र, मागील आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने माळरान आणि जिरायत शेतकऱ्यांनी पेरणी चाठ्यावरील मूठ थांबविली आहे.

आतापर्यंत महसूल मंडलांत झालेली पेरणी

मंडल पेरणी (हेक्टर)

गेवराई ३,१२६

उमापूर ४,१९०

रेवकी २,८१२

धोंडराई ३,३२६

सिरसदेवी ५,१६१

मादळमोही ४,०७४

पाचेगाव ४,४०५

जातेगाव २,९५४

तलवाडा ४,३०८

चकलांबा ३,९५४

पाडळसिंगी ४,२००

कोळगाव ४,३८०

माटेगाव ४,८५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Pending: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

Heavy Rainfall: हिंगोली, नांदेडला सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी

Strawberry Cultivation: स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अर्ज करा

Passion Fruit Farming: नाशिकमध्ये फुलवली ‘पॅशन फ्रूट’ची बाग

Nazare Canal: नाझरे जलाशय वितरिकेच्या दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT