Cotton Sowing
Cotton Sowing Agrowon

Cotton Cultivation : गिरणा काठ परिसरात आगाप कापूस लागवडी

Kharif Sowing : गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. अशा परिस्थितीत ठिबक सिंचनावर या भागात कापूस लागवडी करण्यात आल्या होत्या.
Published on

Nashik News : नांदगाव तालुक्यातील गिरणा काठच्या गावांमध्ये दरवर्षी ठिबक सिंचनावर आगाप कापूस लागवडी मेअखेर सुरू होत असतात. यंदा त्या सुरू झाल्या आहेत. मात्र लागवडीचे क्षेत्र यंदा कमी होण्याचा अंदाज आहे. कापूस पिकाला पर्याय देत शेतकऱ्यांचा मका पिकाकडे कल आहे, असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. अशा परिस्थितीत ठिबक सिंचनावर या भागात कापूस लागवडी करण्यात आल्या होत्या. यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. त्यात पाणीसाठा समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी लागवडी सुरू केल्या आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Cotton Sowing
Cotton Sowing: सघन कापूस लागवडीचे तंत्र

चालू वर्षी मे मध्ये १६ तारखेपासून कापूस बियाणे विक्री सुरू झाली होती. त्यानुसार बियाणे उपलब्ध करून लागवडी सुरू झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यातील बोराळे, आमोदे, गिरणा धरण परिसर, मळगाव, आसपासच्या गावांमध्ये लागवडी होत आहेत. मका पिकाला मागणी वाढत असून उपलब्ध होणारा चारा तसेच नुकसान कमी असल्याने ही स्थिती आहे.

Cotton Sowing
Cotton Sowing : कापसाच्या पेरणी क्षेत्रात ३५ हजार हेक्टरने घट

यासह मजूर टंचाईचा मुद्दा असल्याने कापूस पिकाकडे शेतकऱ्यांचा यंदा कल कमी असेल असे चित्र आहे. त्यातच मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पिकाला पसंती दिली आहे.

मका पिकाकडे कल

जिल्ह्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीच्या तुलनेत मका पिकाकडे दिसून येत आहे. मागील वर्षी किमान आधारभूत किमतीच्या खाली दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये लागवडीसाठी उत्साह नाही. त्यामुळे यंदा लागवड कमी होण्याचा अंदाज आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवड वाढवली आहे. मक्याला मागणी आहे; मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी आगाप कापूस लागवड कमी केल्याने आमच्या कुटुंबाने क्षेत्र वाढवले आहे.
- नितेंद्र राजपूत, कापूस उत्पादक शेतकरी, बोराळे, ता. नांदगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com