Animal Ear Tagging  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Ear Tagging : सांगली, कोल्हापुरातील जनावरांचे इअर टॅगिंग करणे बंधनकारक

Animal Branding : पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणाकरिता, तसेच पशु व पशुजन्य उत्पादनवाढीसाठी पशुधनाचे इअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणाकरिता, तसेच पशु व पशुजन्य उत्पादनवाढीसाठी पशुधनाचे इअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यांतील जनावरांचे इअर टॅगिंग बंधनकारक करून नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना सूचना देण्यात आली आहे. १ जूननंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही.

त्यांच्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यांमध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सर्व महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांना तशाच सूचना दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देय होणार नाही.

कोणत्याही पशुधनाची वाहतूक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. बाजार समित्या, आठवडे बाजार व गावागावांतील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. इअर टॅग नसलेल्या जनावरास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

त्यांची खरेदी-विक्री होणार नाही, याबाबत बाजार समितीने दक्षता घ्यायची आहे. इअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये. पशुधनाच्या मालकी हस्तांतराबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

ग्रामपंचायतीत जनावरांची विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना इअर टॅगिंगशिवाय देऊ नये. दाखल्यावर टॅग क्रमांक नमूद करावा. या आदेशातील सूचनांची व पशुसंवर्धन विभागाच्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेशात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT