Maharashtra Politics: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी (ता. १) एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज विरोधकांनी मागे घ्यावा, असे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत अहिर यांचा उपसभापतिपदाचा मार्ग सुकर केला..उपसभापती पदासाठी मंगळवारी (ता. ३०) महायुतीकडून अहिर यांच्या नावाचे तीन तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अभ्यंकर यांच्या नावाचा एक प्रस्ताव दाखल केला होता. विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र संसदीय परंपरा जपत ही निवड एकमताने व्हावी, अशी विनंती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना केली..Maharashtra Politics: ऑपरेशन राजकीय व्यभिचाराचे!.त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार परब यांनी सभागृहाच्या इच्छेचा मान राखत उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकमताने अहिर यांची उपसभापतिपदी निवड जाहीर करण्यात आली. या निवडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात उपस्थित होते. या निवडीनंतर सर्व सदस्यांनी अहिर यांचे अभिनंदन केले..निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात अहिर हुशार आहेत. ज्या वेळी सभागृहात ते आले त्या वेळी ते धनुष्यबाण चिन्हावर आले. त्यामुळे बदल असा काही घडला नाही, असा निर्वाळा देत अहिर यांची निवड कायद्याच्या कोणत्याही कचाट्यात अडकणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला..Maharashtra Politics: नेमिची येते अधिवेशन.सभागृह संतुलितपणे चालवा : राम शिंदेविधान परिषदेच्या उपसभापतिपदी अहिर यांच्या निवडीबद्दल सभापती राम शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करताना आता क्रिकेटमधील फलंदाजाची बॅट बाजूला ठेवून अम्पायरची हॅट परिधान करण्याची वेळ आली आहे. अम्पायरच्या भूमिकेप्रमाणेच अहिर यांनी सभागृहाचे कामकाज संतुलित, संयमी आणि निष्पक्षपणे चालवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली..अनेकांच्या स्वप्नांवर फिरले पाणीअहिर यांचे अभिनंदन करताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर मिश्कील शब्दांत टीका केली. ‘‘अहिर यांच्या निवडीमुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे, आज अहिरांचा बुलडोझर असा चालला की अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला,’’ असा टोला त्यांनी लगावला, या वेळी सभागृहात एकच हशा पिकवला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.