Climate Challenges for Agriculture: जगभर हवामान बदलाची (क्लायमेट चेंज) चर्चा मागील सुमारे अडीच दशकांपासून आहे. हवामान बदल हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याची कबुलीदेखील बहुतांश देशांनी दिली आहे. परंतु हा विषय आतापर्यंत तरी कोणीही गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. त्याचेच अत्यंत विपरीत परिणाम आज भारत, युरोपसह संपूर्ण जग भोगतोय. सलग तीन वर्षे अतिवृष्टी, महापुराने भारतात थैमान घातल्यानंतर यंदा जूनमध्ये मागील सव्वाशे वर्षांतील पाचव्या क्रमांकाच्या कमी पावसाची नोंद झाली आहे. देशात पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत आहे. हा ‘एल निनो’चा प्रभाव आहे. .तिकडे युरोपमध्ये तापमानवाढीने हाहाकार माजवला आहे. युरोप हा जगातील सर्वाधिक वेगाने तापमान वाढणारा खंड बनला आहे. अनेक युरोपियन देशांमध्ये तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. युरोपियन देशांना ३० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान सहन होत नाही. त्यामुळे सध्याच्या उष्णतेच्या लाटेत १३०० हून जण मृत्यू पावले असून, हा आकडा वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोलंडसह इतरही अनेक देशांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या उष्णतेच्या लाटेला ‘सायलेंट किलर’ म्हटले जात असून, त्याचा विळखा सुमारे १५ कोटींहून अधिक लोकांना पडला आहे..Climate Change Crisis: वातावरण बदलाचे बिकट आव्हान .२०२४ मध्येच पृथ्वीचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात आता समुद्राचे तापमान वाढत असून, हे संपूर्ण जगालाच तापदायक ठरणार आहे. सध्याची युरोपमधील उष्ण लाट ही जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने वाढते कार्बन उत्सर्जन आणि ‘हीट डोम’ हवामान प्रणालीने आलेली आहे. युरोपियन देशांच्या भौगोलिक रचनेत उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे उष्ण हवा एकाच प्रदेशात अडकून राहते. उष्णतेला बाहेर पडण्यास मार्गच नसतो. त्यामुळे तिथे होरपळ वाढली आहे. युरोपमध्ये होरपळ वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे या देशांची एकंदरीतच घरातील अथवा बाहेरील रचना थंडीपासून संरक्षणासाठीची आहे..त्यात उष्ण लाट आल्याने डांबराचे रस्ते वितळत आहेत. रेल्वेचे रूळ प्रसरण पावताहेत. शिवाय घर, कार्यालये, शाळा यांना नैसर्गिक व्हेंटिलेशन नाही, त्यात पंखे नाहीत. त्यामुळे उष्णतेचा सापळा तयार होऊन त्यात जनजीवन असह्य होत आहे. आता काही दिवसांसाठी उष्णतेची लाट आलेली असली तरी २०३० नंतर वर्षातील १००हून अधिक दिवस अशा असह्य लाटांची असणार, असा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेची वारंवारता आणि तीव्रता देखील वाढणार आहे. त्यामुळे सध्याची लाट ही तापमानवाढीचा ट्रेलर आहे, असे यातील जाणकार स्पष्ट करतात..Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान.जागतिक तापमानवाढीचे चटके आशिया खंड मागील अनेक वर्षांपासून सोसत आहे. आता युरोप होरपळतेय. उद्या अजून एखादा नवा खंड, नवा देश याच्या विळख्यात येणार आहे. अशा वेळी कोणत्याही देशाला तापमानवाढीला हलक्यात घेऊन चालणार नाही. सर्वच देशांनी हवामान बदल यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्यापासून स्वतःचा बचाव करण्यावर भर द्यायला हवा..दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतांश सर्व देशांचा नियोजनाचा गाभा हा युद्ध सज्जता होता. तसा आता नियोजनाचा गाभा हा ‘हवामान बदल अनुकूल जीवन’ ठेवून त्यानुसार सर्व देशांना उपाय योजना कराव्या लागणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान बदलाशी लढताना नेहमी उद्भवणारा गरीब-श्रीमंत देश हा भेदही विसरून एकत्रित काम करावे लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.