Animal Ear Tagging : पशुपालकांनी जनावरांचे ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे

Collector Ajit Kumbhar : सर्व पशुपालक बांधवांनी पशुधनाचे इअर टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.
Animal Ear Tagging
Animal Ear Tagging Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास कानात बिल्ला लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सर्व पशुपालक बांधवांनी पशुधनाचे इअर टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा‌द्वारे नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन ‘भारत पशुधन प्रणाली’ कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंगच्या (१२ अंकी बार कोड) नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंधत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीवर संबंधित, पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, अशी सर्व माहिती उपलब्ध होते.

Animal Ear Tagging
Animal Ear Tagging : ‘ईयर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद

त्याकरिता सर्व पशुधनास कानात बिल्ला लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक आहे. राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच ‘प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशू व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे.

१ जूननंतर सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांनी इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तल खान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. महसूल, वन, वीज महावितरण विभाग यांनी नैसर्गिक आपत्ती,

Animal Ear Tagging
Animal Ear Tagging : मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही, कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जबाबदारी संबंधित पशुपालकाची

१ जूनपासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी.

तसेच सर्व ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com