Animal Ear Tagging  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Ear Tagging : पालघरमधील सर्व जनावरांचे ईअर टॅगिंग

National Digital Livestock Mission : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागा‌कडून नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Palghar News : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागा‌कडून नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये १२ अंकी बार कोड ईअर टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे,

अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली. पशुधनाच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, हस्तांतरण, कत्तल होणाऱ्या पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येणार आहेत.

३१ मेपर्यंत राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक आहे. पशुपालकांना पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय १ जूननंतर खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यासाठी या प्रणालीमध्ये पशुधनाच्या कानात ईअर टॅगिंग करून नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनअंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री आदी सर्व नोंदी घेतल्यामुळे माहिती तयार होणार आहे.

या कोषाच्या आधारे शेतकरी, पशुपालकांना सरकारच्या सुविधा, योजना आणि पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारावर कारवाई करण्यात येणार आहे.

ईअर टॅगिंगच्या संदर्भात नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेद्वारे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक जनावरांना ईअर टॅगिंग केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक पशुपालकांनी आपला मोबाईल नंबर व आधार कार्डची माहिती संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना देणे अत्यंत अनिवार्य आहे.
डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पालघर जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT