Jalgaon News : रब्बीसाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम जिल्ह्यात सुरू झाला आहे. यातून शेतकरीच ई-पीक पाहणी अॅपच्या मदतीने आपल्या मोबाईलवरून पिकांची नोंद करू शकणार आहेत.
हे ई पीक पाहणी अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करायचे आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (महसूल) यासंबंधीच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या अॅपमध्ये प्रवेश केल्यानंतर खातेदार आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करू शकतील. त्यात सातबारा उताऱ्यावरील जे नाव आहे, त्याची नोंद करायची आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एकरापेक्षा अधिक खाते क्रमांक किंवा सातबारा उतारे असल्यास संबंधित खातेदार आपल्या गावाची नोंद करून सर्व खात्यांची माहिती या अॅपमध्ये पाहू शकतील. त्यावर पिकपेराही नोंदता येईल. नाव, खाते क्रमांक अॅपमध्ये नोंदविल्यानंतर पासवर्ड प्राप्त होईल.
हा पासवर्ड संबंधित चौकटीत नोंदविल्यानंतर पिकपेरा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित खातेदार या अॅपमध्ये आपल्या पिकपेऱ्याची नोंदणी पाहू शकतील. त्यासाठी सातबाऱ्यावरील नाव व प्राप्त झालेला पासवर्ड चौकटीत नमूद करावा लागेल.
सामाईक मालकीच्या जमिनीतही संबंधित खातेदार स्वतंत्रपणे आपल्या पिकपेऱ्याची नोंद या अॅपमध्ये करू शकतील. अॅपमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला चार अंकी कोड कायमस्वरूपी शेतकरी अॅपमध्ये लॉगीनसाठी वापरू शकतील.
एका मोबाईलच्या मदतीने २० खात्यांची पिकपेरा नोंद करणे शक्य आहे. हा ई पीक पाहणी प्रबोधन कार्यक्रम येत्या शनिवारपर्यंत (ता.१४) सुरू राहणार आहे, असे तलाठी ज्ञानेश्वर माळी (कानळदा, ता.जळगाव) म्हणाले.
ई-पीकपाहणी कार्यक्रमातून रब्बी पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅप डाऊनलोड करावे. यात अडचण येत असल्यास तलाठी कार्यालयाशी संपर्क करता येईल.- ज्ञानेश्वर माळी, तलाठी, कानळदा (ता. जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.