E-Peek Pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : नांदेडला खरिपातील पीक पेऱ्‍याची नोंदणी सुरू

Kharif Season : पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीककर्ज, पीकविमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीकपेरा नोंद गरजेची आहे.

Team Agrowon

Nanded News : पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीककर्ज, पीकविमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीकपेरा नोंद गरजेची आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये ई-पीकपाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा, माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीकविमा आणि पीकपाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे,

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी करून त्यात पीक पाहणी नोंदविण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

खरीप हंगाम २०२४ साठी १ऑगस्ट ते ता. १५ सप्टेंबर २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी ३.०.२ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे.

तसेच ई-पीक पाहणी नोंदणीसाठी काही अडचण आल्यास ई-पीकपाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्षाच्या (०२०) २५७१२७१२ क्रमांकावर किंवा आपल्या गावचे तलाठी, कृषी सहाय्यक संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT