Ravikant Tupkar Youth Foundation  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : ‘भावांतर’साठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Ravikant Tupkar Youth Foundation : भावांतर योजनेचे अनुदान कापूस, सोयाबीन उत्पादकांना तातडीने द्या अशी मागणी रविकांत तुपकर युथ फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

Team Agrowon

Akola News : कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय घेतला. मात्र, शासनाने ई-पीक पाहणीची जाचक अट टाकली आहे.

ती काढून भावांतर योजनेचे अनुदान कापूस, सोयाबीन उत्पादकांना तातडीने द्या अशी मागणी रविकांत तुपकर युथ फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. चंद्रशेखर गवळी व शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले.

याबाबत निवेदनात म्हटले, की जाचक अटींमुळे हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. आधीच नापिकी, दर वर्षी पडणारा दुष्काळ, शेतीमालाला न मिळणारा भाव, यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहोचला आहे.

त्‍यामुळे शासनाने हा निर्णय तत्काळ बदलून सर्व सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देण्याचा सर्वसमावेशक निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात शेतकऱ्यांचे जन आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात दिला.

या वेळी चंद्रशेखर गवळी, संजय सोनोने, गोपाल पोहरे, नितीन गावंडे, प्रमोद खेडकर, अशोक म्हैसने, रवी कदम, केशव लढे, शेख मोहसीन, अयुब खाँ सत्तार खाँ, अफरोज खाँ आरीफ खाँ, इलावर खाँ, प्रमोद लाखे, जायद खाँ नूर खाँ, संतोष लाखे, ईलियास खाँ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT