E-KYC Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer E-KYC : पीक नुकसान भरपाईसाठी ई- केवायसी आवश्यक

E-KYC Update : शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास अनुदान मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

Team Agrowon

Buldhana News : मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ६८ कोटी २९ लाखांची मदत वितरित होणार आहे. ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास अनुदान मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने संयुक्तपणे पिकांचे पंचनामे केले होते.

या तालुक्यामध्ये २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपीट झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले होते. यात तालुक्यातील सिंदखेडराजा, किनगावराजा, दुसरबीड, सोनोशी येथे मोठे तर मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा या महसूल मंडलांमध्ये काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते.

तालुक्यातील फळबागांना सुद्धा पाऊस व गारपिटीमुळे मोठा फटका बसला होता. त्यासाठी शासनाने मदत जाहीर केली. तालुक्यातील ४७ हजार १५ हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत मिळणार आहे. परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. आपले सरकार केंद्रावर शेतकरी ई-केवायसी करीत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील सुमारे ६४ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा अनुदान मिळणार नाही, असे आवाहन महसूल विभागाने केले होते. सध्या महा-ई-सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ‘व्हीके’ नंबर आला असून शेतकऱ्यांच्या याद्या आपले सरकार केंद्रामध्ये लावण्यात आल्या आहेत. ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
सचिन जैस्वाल, तहसीलदार, सिंदखेड राजा
या वर्षात अनेक संकटांना शेतकरी सामोरे जात आहे. आता शासनाने शेतकऱ्यांना ई-केवायसीची सक्ती केली आहे. ई-केवायसी काही ठिकाणी विनामूल्य होत आहे तर काही ठिकाणी पैसे द्यावे लागत आहेत. ई-केवायसी न करता थेट अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी. काही शेतकऱ्यांच्या खात्याला बँकांकडून होल्ड लावण्यात आला आहे. प्रशासनाने होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
लिंबाजी डोईफोडे, शेतकरी, राहेरी खुर्द

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT