PM Kisan Yojana : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी e-KYC तात्काळ पूर्ण करुन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पी. एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्याना e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे म्हणाले.
केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण केल्याशिवाय त्यांना पुढील हप्ते वितरित होणार नाहीत. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थ्याना e-KYC पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.
जेणेकरुन केंद्र शासनामार्फत वितरीत करावयाच्या चौदाव्या व इतर संबंधित हप्त्याचा वितरणाचा प्रश्न उद्भवणार नाही. सर्व पात्र लाभार्थ्यांना e-KYC करण्यासाठी OTP किंवा Biometric हे पर्याय उपलब्ध करुन दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्या जिल्हयात ८५ टक्के e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी e-KYC प्रमाणीकरण लवकरात लवकर करावे.
यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर farmer corner या ठिकाणी e-KYC मध्ये आधार नंबर टाईप करुन पुढे येणाऱ्या निर्देशांचे पालन करावे व ही प्रक्रिया पूर्ण करावी. नजिकच्या महा ई-सेवा केंद्रामधून e-KYC करुन घ्यावी असे कांबळे म्हणाले.
पीएम किसान लाभार्थ्यांची ई-केवायसी नियुक्त केंद्रावर बायोमेट्रिक्सद्वारे किंवा आधार लिंक केलेल्या मोबाइल फोन नंबरवर पाठवलेल्या वन टाइम पासवर्डद्वारे केली जात होती. याबाबत आता नवीन पद्धत आली आहे.
याची माहिती अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार मेहराडा यांनी दिली, पीएम किसान योजना ही फेशियल ऑथेंटिकेशन मोबाईल ॲपद्वारे ई-केवायसी करणारी सरकारची पहिली योजना ठरली आहे. जे शेतकरी वयस्कर आहेत आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेला नाही त्यांच्यासाठी हे ॲप अतिशय उपयुक्त असल्याची माहिती मेहराडा यांनी दिली.
पहिल्यांदा PM Kisan App गूगल प्ले स्टोअरवरून तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये डाउनलोड करावे लागेल.
आता ॲपमध्ये आधार क्रमांक आणि लाभार्थी आयडी (पीएम किसान योजनेचा आयडी) टाकून लॉग इन करा.
यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर चार अंकी ओटीपी येईल.
हा चार अंकी ओटीपी पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये टाकावा लागेल. यासह, ॲपमध्ये लॉगिन केले जाईल.
लॉगिन होताच शेतकरी फक्त अर्ध्या मिनिटात फेस ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे त्याचे ई-केवायसी पूर्ण करू शकतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.