Land Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

E-Counting of Land : राज्यात जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १०६ तालुक्यांमध्ये काम सुरू झाले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : राज्यात जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १०६ तालुक्यांमध्ये काम सुरू झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये पुढील महिन्यापासून काम सुरू होणार आहे.

जमिनींच्या अचूक मोजणीसाठी राज्य सरकारने ‘ई-मोजणी २.०’ ही संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे येणारे जमीन मोजणी अर्ज हे ‘जीआयएस’ आधारित रोव्हर्सद्वारे मोजणी केले जात आहेत. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीचे तंतोतंत अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत.

परिणामी, जमिनीची अचूक मोजणी होऊन, शेतकऱ्यांमधील जमिनीचे वाद कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी केलेल्या जीआयएस आधारित मोजणी नकाशे अक्षांश, रेखांशांसह सरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पुरविले जाणार आहेत.

त्यामुळे एखाद्या सरकारी मोजणी झालेल्या जमिनीचे नकाशे शेतकऱ्यांना तत्काळ ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. या प्रणालीद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा या तालुक्यांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून उर्वरित सहा तालुक्यांमध्ये हे काम सुरू केले जाणार आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची हद्द कायम करणे, पोटहिस्सा, सामिलीकरण, बिनशेती, कोर्ट वाटप, कोर्ट कमिशन आणि विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. सरकारी मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रती पुरविल्या जातात.

या मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रतीमध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणीवेळी वहिवाटी किंवा ताब्यानुसार अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टिपा नमूद करून मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पुरविली जाते. मात्र, आता जमीन मोजणीच्या या सर्व गोष्टी अचूक होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित जमीन नेमकी कुठे आहे? तिचा आकार कसा आहे? याची अचूक माहिती सहजरीत्या या प्रणालीमुळे मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT