Land Survey : पुरंदर, बारामतीत संगणकाद्वारे ई-मोजणी

Bhumi Abhilekh Department : भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी ही संगणक प्रणाली अद्ययावत केली असून, आता ई-मोजणी २.० या नवीन प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात करण्यात येत होता.
E Land Survey
E Land SurveyAgrowon

Pune News : भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी ही संगणक प्रणाली अद्ययावत केली असून, आता ई-मोजणी २.० या नवीन प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात करण्यात येत होता. आता यामध्ये दोन तालुक्यांची वाढ करण्यात आली असून, पुरंदर आणि बारामती तालुक्यांतही ई-मोजणी २.० चा वापर करून मोजणी केली जात आहे.

संगणक प्रणालीमुळे जमीनधारक स्वतः मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. मोजणी फीदेखील ऑनलाइन भरण्याची सुविधा असून, यांसह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळणार आहे. जमीन मोजणीच्या नकाशाची ‘क’ प्रत ऑनलाइन मिळणार आहे.

E Land Survey
Land Survey : शेतजमिनींच्या जलद मोजणीसाठी आणखी ६०० रोव्हर खरेदी करणार

भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची हद्दकायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्टवाटप व कोर्ट कमिशन व विविध प्रकल्पांकरिता भूमी संपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जात आहे. ई-मोजणी २.० या संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणारे मोजणी अर्ज जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे मोजणी करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.

E Land Survey
Drone Land Survey : ‘ड्रोन’च्या मदतीने गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड

मागील वर्षभरापूर्वी ‘ई-मोजणी २.०’ प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस नंदुरबार व वाशीम या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात या प्रणालीनुसार मोजणीची कामे करण्यात येत आहे.

आता यामध्ये पुरंदर आणि बारामती तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये ई-मोजणी २.० प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.

ई मोजणीची वैशिष्ट्ये :

- जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

- मोजणी फी ऑनलाईन भरण्याची सुविधा

- अर्जाची सद्यःस्थिती एमएमएसने कळणार

- जमीन मोजणी प्रत ऑनलाईन मिळणार

- जमिनीचे लोकेशनही कळणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com