Dwarkadhish Sugarcane Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2023 : यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे ‘द्वारकाधीश’चे उद्दिष्ट

Sugarcane Market : द्वारकाधीश साखर कारखान्याचे यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : द्वारकाधीश साखर कारखान्याचे यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी केले. शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या २४ व्या गाळप हंगामाच्या बॉयलर पूजनप्रसंगी सावंत बोलत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वेळी उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, संचालक कैलास सावंत यांच्या हस्ते द्वारकाधीश मंदिरात पूजन करून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, शोभा भालेराव, मुख्य शेतकी अधिकारी विजय पगार, वैशाली पगार, एस. ई. साळुंखे, ए. आर. सोनवणे, भूषण नांद्रे, बापू सूर्यवंशी, प्रभाकर रणदिवे त्यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले.

सावंत म्हणाले, की कर्मचारी, प्रशासन यांची एकत्र मोट बांधली तरच सर्वांच्या एकीच्या बळातून विकासाची संधी मिळते. कोणतेही काम करताना जिद्द व चिकाटी असल्यास शंभर टक्के यश मिळते. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी द्वारकाधीश परिवारातील सदस्य असल्यामुळे आजपर्यंत कोणताही कर्मचारी, मजूर व शेतकऱ्यांचा रुपया कारखान्याकडे बाकी नसून दिवाळीच्या आत परंपरेप्रमाणे सर्वांना बोनस देणार असल्याचे सावंत यांनी जाहीर केले.

विजय वाघ यांनी कार्यक्षेत्रात दुष्काळी परिस्थितीवर मात करून उसाची लागवड व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कैलास वाघ, बाळासाहेब करपे, नाना रौंदळ, सतीश सोनवणे, कारभारी बोरसे, दीपक आहेर, संजय अहिरराव, महिंद्र अहिरराव, साहेबराव पगार, गोपी शेलार, संजय देवरे,दीपक पवार, प्रकाश चव्हाण, विलास खैरनार यांच्यासह कारखान्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT