Stamp Duty  Agrowon
ॲग्रो विशेष

Stamp Duty Abhay Scheme : दस्त, मुद्रांकाच्या दंड थकबाकीसाठी मुद्रांक शुल्क अभय योजना

Maharashtra Stamp Duty Abhay Yojana 2023 : शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ लागू केलेली आहे. ही योजना १ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यात लागू केलेली आहे.

Team Agrowon

Amnesty Scheme 2023 : शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ लागू केलेली आहे. ही योजना १ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्प्यात लागू केलेली आहे.

या योजनेमध्ये एक जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्याबाबतीत शासनास देणे असणाऱ्या आणि वसुलीस पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट देण्यात येणार आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपूर्ण माफी तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखावर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के व दंडाची संपूर्ण माफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय

होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के सुट तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखाच्यावर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के व दंडामध्ये ७० टक्के माफी देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात शुल्कात २५ टक्के, दंडात ९० टक्के सूट
योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडाची रक्कम ही २५ लाखांपेक्षा कमी असल्यास दंडामध्ये ९० टक्के माफी.

तसेच दंडाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त असल्यास केवळ २५ लाख रक्कम दंड म्हणून स्वीकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रक्कमेला माफी. देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी तसेच दंडात एक लाख रक्कम स्वीकारून दंडाच्या रक्कमेत सूट देण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात शुल्कात २०
टक्के, तर दंडात ८० टक्के सूट

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटी पर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के व दंडामध्ये ८० टक्के सूट. तसेच दंडाची रक्कम ५० लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ ५० लाख रक्कम दंड म्हणून स्वीकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रक्कमेत सुट.

देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटी पेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात १० टक्के माफी तसेच दंडात रुपये २ कोटी रक्कम दंड म्हणून स्वीकारण्यात येऊन उर्वरित दंडाची रक्कमेची सुट देण्यात येणार आहे.

मुद्रांक शुल्क विभागातर्फे ज्यांना मुद्रांक शुल्क भरणेबाबत नोटीस आलेली आहे. तसेच ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता यापूर्वी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला आहे. त्यांनी लाभ घ्यावाच, पण नव्या इच्छुकांनाही यामध्ये सहभाग घेता येईल.
- गो.द. गिते, मुद्रांक जिल्हाधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT