Diwali ST Passengers  Agrowon
ॲग्रो विशेष

Diwali ST Passengers : दिवाळीत १५ लाख प्रवाशांनी केला एसटीने प्रवास

ST Buses Update : दिवाळीच्या काळात पुणे विभागातून मोठ्या प्रमाणात एसटी बस सोडण्यात आल्या होत्या.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : दिवाळीच्या काळात पुणे विभागातून मोठ्या प्रमाणात एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. नियमित सोडलेल्या आणि जादा बसमधून तब्बल पंधरा लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून पुणे विभागाला जवळपास १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

दरम्यान, भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी विभागातून तब्बल एक लाख ५१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून एसटीला दोन कोटी १० हजारांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीच्या दहा दिवसांतील ही सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली.

गेल्या काही महिन्यांपासून एसटीला प्रवाशांची पसंती वाढली आहे. पुणे एसटी विभागाकडून दिवाळीत नियमित आणि खडकी येथील मैदानातून जादा बस सोडण्यात आल्या. यंदा ५५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले होते. विभागातील १३ आगारांतून ८८० जादा बस सोडल्या होत्या.

एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीकडे प्रवासी मोठ्या संख्येने वळले आहेत. अजूनही पुढील आठ दिवस ही गर्दी कायम राहणार आहे.

एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत १० टक्के भाडेवाढ करण्यात येते. यंदा राज्य सरकारने ही भाडेवाढ रद्द केली. यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी एसटीच्या पुणे विभागात उत्पन्नात सुमारे आठ टक्के घट झाली आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT