MSRTC Ticket Hike Cancelled : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ रद्द, सामान्यांना दिलासा

MSRTC Ticket Rate : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. परंतु सरकारने १० टक्के भाडेवाढ रद्द केली आहे.
MSRTC Ticket Hike Cancelled
MSRTC Ticket Hike CancelledAgrowon
Published on
Updated on

Maharashtra ST Ticket : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी हा दर लागू करण्यात आला होता. परंतु प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक सोमवार (ता.१४) काढण्यात आले.

सध्या सणासुदीमुळे लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी जातात तर काहीजण पर्यटनस्थळांना भेटी देतात. सलग सुट्ट्यांचा विचार करून एसटी महामंडळाकडून गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करण्यात येत असते.

MSRTC Ticket Hike Cancelled
Maharashtra Politics : महायुतीशी संबंधित पाच सहकारी साखर कारखान्यांना ८१५ कोटी रुपयांच्या कर्जाची शिफारस

एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरीता भाडेवाढ लागू करण्यात आलेली नसल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

राज्य परिवहन मंडळाला दररोज २३ ते २५ कोटी रूपयांच्या आसपास उत्पन्न मिळत असते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र ६ कोटी रुपयांनी वाढणे शक्य होते. परंतु राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने यंदा राज्याच्या तिजोरीतील हा पैसा कमी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com