Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : रिमझिम पावसाने आंतरमशागतीच्या कामांचा खोळंबा

Interculture Operation Issue : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील गेल्या तीन, चार दिवसांपासून अनेक मंडलांत रिमझिम पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांतील आंतरमशागती तसेच फवारणीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील गेल्या तीन, चार दिवसांपासून अनेक मंडलांत रिमझिम पाऊस सुरू असल्याने खरीप पिकांतील आंतरमशागती तसेच फवारणीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. तणांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या दोन जिल्ह्यांतील ८१ मंडलांमध्ये रविवारी (ता. २१) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

या दोन जिल्ह्यांत मागील आठवड्यापासून सुरू असलेला हलका ते मध्यम पाऊस जमिनीतील ओलावा तसेच पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. परंतु अनेक मंडलांत अद्याप मोठा पाऊस नसल्यामुळे नाले, ओढे, नद्यांना मोठे पूर लोटले नाहीत. विहीर, कूपनलिकांतील पाणी अजून तळालाच आहे.

परभणी जिल्ह्यातील ५१ मंडलांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ७.९ मिमी, जुलै महिन्यात सरासरी १५८.४ मिमी, यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ३२८.८ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ८.८ मिमी, जुलै महिन्यात सरासरी १८४.४ मिमी, यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ३३३.५ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा : परभणी ८.८, पेडगाव १०.८, जांब १०.५, झरी १०, सिंगणापूर ५.८, दैठणा ११.३, पिंगळी १२.३, परभणी ग्रामीण २०.८, टाकळी कुंभकर्ण ८, बोरी १०, आडगाव ६.५, वाघी धानोरा ६.३, दूधगाव ९.३, देऊळगाव ५.५, वालूर ६, मानवत ६.३, केकरजवळा ७.५, कोल्हा १२.८, ताडबोरगाव १४.५, रामपुरी १०.५, पाथरी ७.३, सोनपेठ ५.८, शेळगाव ५.८, वडगाव ७.३, गंगाखेड ८.८, माखणी ५.८, राणीसावरगाव ८, पिंपळदरी ११.३, पालम ९.५, चाटोरी ५.५, बनवस ७.८, पेठशिणी ७.८, रावराजूर ७.५, पूर्णा १२.८, ताडकळस १३.५, लिमला ९.८, कात्नेश्वर २०.८, चुडावा ८.५, कावलगाव ८.३.

हिंगोली जिल्हा : हिंगोली ७.३, नरसी ५.३, सिरसम ७.३, बासंबा ७.३, दिग्रस कऱ्हाळे ९.८, माळहिवरा ७.३, खंबाळा ७.३, कळमनुरी ६.५, वाकोडी ८.८, नांदापूर ८.३, आखाडा बाळापूर ८.५, डोंगरकडा १६.५, वारंगा १६.८, वसमत ११.८, आंबा १२.५, हयातनगर ११.८, गिरगाव१५.८, हट्टा ११.५, टेंभुर्णी ९.८, कुरुंदा १३, औंढा नागनाथ ११.५, येळेगाव ११.३, साळणा ८, जवळा बाजार ८.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT