Loksabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीमुळे शासकीय कार्यालये पडली ओस

Pune News : राज्यासह पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. शिरूर लोकसभेसह पुणे आणि मावळ लोकसभेचे १३ मे रोजी मतदान असल्याने आचारसंहिता लागू आहे.

Team Agrowon

अग्रोवन वृत्तसेवा
Election : पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. शिरूर लोकसभेसह पुणे आणि मावळ लोकसभेचे १३ मे रोजी मतदान असल्याने आचारसंहिता लागू आहे. निवडणुकीसाठी विविध विभागांच्या तब्बल २० हजार कर्मचारी कामासाठी घेण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र कामासाठी कार्यालयांचे उंबरठे मात्र झिजवावे लागत आहेत.

सध्या ग्रामपंचायत पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वच सरकारी गेल्यानंतर साहेब कार्यालयात निवडणूक कामात व्यग्र असल्याचे सांगण्यात येते. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच निवडणूक कामासाठी जुंपले असल्याचे इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला हात हलवत माघारी परतावे लागत आहे.

सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारून कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून निवडणूक ड्यूटी नसणाऱ्या काम न करण्याची इच्छा असणाऱ्या काही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळित झाले आहे. त्यामुळेच आता १३ मे रोजी मतदान होईपर्यंत हीच परिस्थिती असणार असून नागरिकांनी सरकारी कार्यालयांत जाण्याचे टाळले असल्याचे पाहायला मिळते.

निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पीएमआरडीए, पोलिस, शिक्षण, सहकार पाटबंधारे, इत्यादी विभागांतून कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहेत. निवडणूक ड्यूटी लागलेले कर्मचारी एकूण संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशही नाहीत. तरीही निवडणुकीच्या नावाखाली बरीच सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. निवडणूक कामाचा अनुभव असल्याने महसूल, सहकार, शिक्षण या विभागांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या कामासाठी घेतले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

SCROLL FOR NEXT