Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Retreating Monsoon : परतीच्या पावसाचा दणका, लातुरात घरात शिरले पाणी

Heavy Rain : परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. २४) चांगलाच दणका दिला. चारच तासाच्या पावसाने धुमाकूळ घातला. यात शहरात व मुरूड (ता. लातूर) येथे अनेक घरे व दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले. मु

Team Agrowon

Latur News : परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. २४) चांगलाच दणका दिला. चारच तासाच्या पावसाने धुमाकूळ घातला. यात शहरात व मुरूड (ता. लातूर) येथे अनेक घरे व दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले. मुरूडमध्ये काही नागरिकांना मंदिरात स्थलांत्तरीत करावे लागले.

काठावर असलेले मांजरा व निम्न तेरणा ही दोन्ही मोठी धरणे ओव्हर फ्लो झाली असून मंगळवारी सायंकाळी निम्न तेरणाची १४ दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला तर बुधवारी (ता. २५) दुपारी साडेबारा वाजता मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू झाला आहे. एवढे दिवस जोत्याखाली असलेल्या रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा आला आहे.

गेल्या काही दिवसापासून लातूर व धाराशिव जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पावसामुळे सोयाबीनची काढणी ठप्प झाली आहे. काही भागात मंगळवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही भागात दुपारी चार व सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान अतिवृष्टी झाली. या पावसामुळे लातूर शहरात नाल्यातील पाणी रस्यावर व रस्त्यावरचे पाणी घरात व दुकानात शिरले.

यामुळे नागरिकांच्या घरातील धान्य व वस्तूंचे नुकसान झाले आहे. मुरूडमध्ये चार तासात १६८ मिलिमीटर पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा, इटकूर, तेर आदी भागातही जोरदार पाऊस झाला. मुरूडमध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला. यामुळे पाणी घरात व दुकानात शिरले.

दत्तनगर भागात अडकलेल्या ६० नागरिकांना दत्तमंदिरात हलवण्यात आले. मुरूड ते पाडोळी तसेच पाडोळी ते नायगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे लातूर शहरात रात्री वाहतूक ठप्प झाली होती. तर काही भागात साचलेल्या पाण्याला वाट करून देण्याचे प्रयत्न सुरू होते. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला चांगलाच फटका बसला असून शेतकऱ्यांना शेतात चिखल झाल्यामुळे काढणी थांबवावी लागली आहे.

‘रायगव्हाण’मध्ये रात्रीतून २० टक्के पाणी

निम्नतेरणा प्रकल्प मंगळवारी सायंकाळी भरल्यानंतर त्यातून तेरणा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली. मांजरा धरणात सकाळी दहा वाजता ९६ टक्के पाणीसाठा झाला असून पाण्याची आवक सुरू असल्याने साडेबारा वाजता दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडून १७३० क्युसेक्स विसर्ग सुरू झाला.

मुरूड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एवढे दिवस जोत्याखाली असलेल्या रायगव्हाण प्रकल्पात एका रात्रीत ३ दशलक्ष घनमीटर (२० टक्के) पाणी आले आहे. अजून पाणी येवा सुरू असून लवकरच प्रकल्पात चांगले पाणी येण्याची आशा जलसंपदा विभागाचे आर. डी. पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT