Cotton Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop : दरांवरील दबाव, बोंड अळीमुळे कापूस पीक काढले

Cotton Pest : खानदेशात कापूस दरांवर सतत दबाव आहे. तसेच दरांबाबबत अनेक अफवाही आहेत. पिकात गुलाबी बोंड अळीदेखील वाढली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस दरांवर सतत दबाव आहे. तसेच दरांबाबबत अनेक अफवाही आहेत. पिकात गुलाबी बोंड अळीदेखील वाढली आहे. यामुळे खोडवा किंवा फरदड कापूस पीक शेतकऱ्यांनी काढले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला दर कमी होते. मध्यंतरी दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. परंतु नोव्हेंबरच्या अखेरीस दर सतत कमी झाले.

सध्या किंवा मागील पाच ते सात दिवसांपासून दरात लक्षणीय घट दिसत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पीक काढायला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी दर चांगले मिळतील, यासाठी मका, गहू, बाजरी आदी पिके टाळून फरदड कापूस पीक तसेच ठेवले होते. परंतु दर हवे तसे नाहीत.

मागील हंगामातही शेतकऱ्यांच्या फरदड कापसाला कमी दर मिळाले होते. यंदाही बाजार अस्थिर आहे. शिवाय मजुरी वाढली आहे. सध्या २०० रुपये रोज, अशी मजुरी महिला सकाळी आठ ते तीन यादरम्यान कामासाठी घेत आहेत. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने वेचणीवर हवा तेवढा कापूस येत नाही.

बोंडे व्यवस्थित उमलत नाहीत. त्यात कचरा, किडीही येतात. यामुळे कापसाचा दर्जाही घसरतो. बाजारात तेजी नसल्याने फरदड कापूस घेण्यासंबंधी खरेदीदार उत्साह दाखवित नाहीत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारण फरदड कापूस पिकाचे एकरी फक्त अर्धा क्विंटल उत्पादन सद्यःस्थितीत शक्य आहे.

त्याला वेचणी व इतर बाबींची मजुरी लक्षात घेऊन किमान चार हजार रुपये खर्च आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक घेणे टाळले आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, त्या शेतकऱ्यांनी गहू, बाजरीची पेरणी सुरू केली आहे. यामुळे गहू पेरणीदेखील खानदेशात सुरूच आहे. काही शेतकरी लवकर येणाऱ्या मका वाणांची लागवड कापसाखालील क्षेत्र रिकामे करून करीत आहेत.

मोठे क्षेत्र रिकामे

जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६६ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. यात सुमारे सव्वालाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड झाली होती. पूर्वहंगामी कापसाखालील ९५ टक्के क्षेत्र पीक काढून रिकामे झाले आहे.

तसेच कोरडवाहू कापूस पीकही काढून त्यात पाट किंवा इतर शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन शेतकरी पिकांची लागवड करीत आहेत. धुळ्यातही पूर्वहंगामी कापसाखालील सुमारे १५ ते १८ हजार हेक्टर क्षेत्र रिकामे झाले आहे. नंदुरबारमध्येही सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पीक काढण्यात आल्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT