Kolhapur Drought agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Drought : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने तिन्ही हंगामातील पिकांवर परिणाम

Rain in Kolhapur : गतवर्षी पावसाळ्यात फक्त ५० टक्केच पाऊस झाला. यामुळे पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळा हंगाम शेतकऱ्यांना अडचणीचा ठरला आहे.

sandeep Shirguppe

Drought Condition Kolhapur : मागच्या वर्षी अल् निनोच्या स्थितीमुळे राज्यातील अनेक तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पाऊस झाला नाही. याचा परिणाम खरिप, रबी आणि उन्हाळी पिकांच्या वाढीवर दिसून येत आहे. यंदा उन्हाळी हंगामात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र घटले असून, फक्त दोन हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही तालुक्यांत तुरळक ठिकाणी वळीव पडला असला तरी शेतकऱ्यांना आता मोठ्या वळीव पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

जिल्ह्यात गतवर्षी पावसाळ्यात फक्त ५० टक्केच पाऊस झाला. यामुळे पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळा हंगाम शेतकऱ्यांना अडचणीचा ठरला आहे. जिल्ह्यात जानेवारी ते मे उन्हाळी हंगामात पिके घेतली जातात. जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र असते. गतवेळी पाऊसमान कमी राहिले, यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीत पाणी असताना उपसाबंदी केली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना ताण पडून पाणी द्यावे लागत आहे.

परिणामी, उत्पादन घटणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात भुईमूग १६९० हेक्टर, भात २२५ हेक्टर, सूर्यफूल दीडशे हेक्टर, सोयाबीन ६५ हेक्टर असे सुमारे दोन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पेरणीचा हंगाम संपला असून, उन्हाळी हंगामाचे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे.

उपसा या मार्गावरील मुरगूडहून मुदाळ तिट्ट्याकडे जाणारी सर्व वाहतूक निढोरीमार्गे-सोनाळी रोड-बिद्रीकडे वळवली जाणार आहे, तर मुदाळ तिट्ट्याहून मुरगूड-निपाणीकडे जाणारी वाहतूक कूर, व्हनगुत्ती, वाघापू फाट्याहून पुढे मार्गस्थ होतील भाविकांची वाढती संख्या लक्षात बंदीमुळे पिकाला ताण पडून पाणी द्यावे लागत आहे. यामुळे भुईमुगाचे उत्पादन घटेल असे चित्र आहे.

दोन दिवसांपूर्वी आजरा तालुक्यात सहा मंडळांमध्ये, चंदगडमध्ये दोन मंडळांमध्ये, करवीर तालुक्यात दोन मंडळांमध्ये, पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी वळवाचा पाऊस झाला. उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याचे फेर पिकांना वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. उसाच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एखाद्या वळीव पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी प्लास्टिक आच्छादन व पाचट आच्छादन करून पिके घ्यावीत, भाजीपाला करावा. चारा टंचाई पाहता चारा पिके घ्यावीत. मुरघास तयार करावा.

अरुण भिंगारदिवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक

उन्हाच्या कडाक्यामुले 66 पिकांना पाण्यासाठी ताण पडत आहे. दोन एकर उसाच्या क्षेत्रात पाचट आच्छादन केले आहे. त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. यापुढे शेतकऱ्यांनी खोडवा पिकाला १०० टक्के पाचट अच्छादन करणे काळाची गरज आहे.

तानाजी मोरे, प्रगतिशील शेतकरी, कोगे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT